Type Here to Get Search Results !

Warje Crime: वारजे मध्ये अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याला भाजी विक्रेत्यांची मारहाण; चार जण गजाआड

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

warje encroachment- checkate times

पुणे, दि. 21 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): रविवार असताना देखील अतिक्रमण कारवाई (Encroachment action by PMC) का करता? एक दिवस तरी जगण्यासाठी धंदा करू द्या ! अशी मागणी करत, रविवारी कारवाईला आलेल्या पथकावर संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्यांनी उद्विग्नतेतून पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण (Beating PMC officers and employees) केल्याची घटना घडली आहे. यानंतर चार भाजी विक्रेत्यांना सरकारी कामात अडथळा (Disruption of government work) आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून, वारजे पोलीस (Warje Police Station) तपास करत आहेत.

सदरील घटना रविवार दि. 19 मार्च 2023 रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास गणपती माथा (Ganapati Matha), न्यू अहिरेगाव (New Ahiregaon) आणि एनडीए मैदानाच्या (NDA Ground) भागात कारवाई सुरू असताना घडली. याप्रकरणी पुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण निरीक्षक अंकुश बादाड (Encroachment Inspector PMC Pune Ankush Badad) यांनी वारजे पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, नवनाथ बाळासाहेब वांजळे (वय-32 वर्ष) (Navnath Balasaheb Wanjale), रोहन मल्हारी माळशिखरे (वय. 18 वर्ष) (Rohan Malhari Malshikhare), सुभाष मारुती बोडके (वय. 40) (Subhash Maruti Bodake) आणि गणेश गोरबा हुंबरे (वय. 30 वर्ष) (Ganesh Gorba Humbare) यांच्यासह इतर चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ 3 (PMC Zone 3) मध्ये अंकुश बादाड अतिक्रमण निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. रविवारी बादाड आपल्याकडील पथकासह महापालिकेच्या वाहनाने वारजे येथील गणपतीमाथा परिसरात पदपथ व रहदारीच्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एनडीए मैदानाजवळ रहदारीच्या रस्त्यावर काही भाजी व फळविक्रेत्यांनी रस्त्यावरच विक्री सुरू ठेवल्याने बादाड यांनी त्यांना क्रेट व पथारीवर कारवाई सुरु केली.

हेही वाचा - शहरातील अतिक्रमण अधिकारी खासगी लोकांमार्फत मनमानी वसूली करत असल्याची आरोग्यमंत्र्यांची तक्रार; चौकशी होणार?

यावेळी ‘रविवार, सुटीचा दिवस असल्याने तुम्ही कारवाई कशी करता,’ असा सवाल करून, विक्रेत्यांनी शिवीगाळ करत, टेंपो मध्ये बसलेल्या बादाड यांना विक्रेत्यांनी वाहनातून बाहेर खेचले व हाताने व बांबूने मारहाण केली. या मारहाणीत बादाड यांच्या करंगळीच्या शेजारील बोट मोडले. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तेथून सुटका करून घेऊन, पळ काढल्याने पुढील अनुचित घटना टळली. याबाबत वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक काळे (Police Sub-Inspector Kale) तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.