Type Here to Get Search Results !

Pune News: कोथरूड टेकडीवरील अनधिकृत पत्राशेडवर पुणे महानगरपालिकेचा हातोडा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news 

pmc removes unauthorized tract at kothrud hill - checkmate times

पुणे, दि. 21 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): शहराच्या (Pune City) आजूबाजूला अनेक टेकड्या आहेत. त्यावर कित्येक वर्षांपासून वन्यजीव, पक्षी यांचा अधिवास आहे. तिथे दुर्मीळ वृक्षराजी बहरत असते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून शहरातील टेकड्यांवर अतिक्रमण केले जात आहे. काही ठिकाणी त्या तोडल्या जात आहेत.

कोथरूडमधील जिजाईनगर (Jijainagar, Kothrud) येथे अतिक्रमण करून शेड उभ्या केल्या होत्या. त्यावर कारवाई करत महापालिकेच्या वतीने हे शेड काढण्यात आले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे हे अतिक्रमण उघडकीस आले होते. काही समाजकंटक या टेकड्यांवर अतिक्रमण करून तेथील अधिवास, झाडे नष्ट करत आहेत. त्याविरोधात वेताळ टेकडीवर अनेक ग्रुप कार्यरत आहेत. तसेच कोथरूडमधील महात्मा टेकडी, म्हातोबा टेकडीसाठीही टेकडीप्रेमी समोर येत आहेत.

कोथरूड येथील टेकडीप्रेमी मकरंद शेटे (Hill lover in (Kothrud) Makrand Shete) म्हणाले कि,”आम्ही म्हातोबा टेकडीवर अनेक वर्षांपासून झाडं लावली आणि ती जोपासली आहेत. या टेकड्यांवर अनधिकृतपणे राहण्याचा घाट काहीजण करत आहेत. कोथरूडमधील जिजाईनगर परिसरातील टेकडीवर काही दिवसांपासून अतिक्रमण झाले होते. तिथे पत्र्यांचे शेडही मारले होते. त्याविरोधात आम्ही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना भेटलो आणि सर्व माहिती दिली. त्यानंतर त्याची दखल घेऊन त्यांनी त्वरित शेड काढण्याची मोहीम राबविली.”

हेही वाचा - अखेर फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील अतिक्रमणांवर पुणे महानगरपालिकेचा हातोडा

पुढे ते म्हणाले,”काही दिवसांपूर्वी महात्मा टेकडीवरही अतिक्रमण झाले होते. अनेकांनी वाहने वर नेली होती. तेव्हा त्याविषयी तक्रार केल्यावर तेथून अतिक्रमण काढले. आता टेकडीवर वाहने येऊ नयेत म्हणून ठिकठिकाणी चर खोदले आहेत. जेणेकरून वाहने तिथून जाणार नाहीत.”

“कोथरूड परिसरात महात्मा टेकडी (Mahatma tekdi), एआरआय टेकडी (ARAI), म्हातोबा टेकडी (Mhatoba tekdi) आहे. त्या ठिकाणांवर आम्ही दररोज लक्ष ठेवून आहोत. सातत्याने टेकडीवर अतिक्रमण केले जात असल्याने याविषयी प्रशासन, वन विभागाने गस्त वाढविणे आवश्यक आहे.” असेही त्यांनी सांगितले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.