Type Here to Get Search Results !

Pune Crime News: भाजपच्या माजी नगरसेविकेसह चौघांवर गुन्हा दाखल; बस चालकाला केली मारहाण

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

bus friver accident and fight with car driver - checkmate times

पुणे, दि. 16 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पीएमपी चालक (pmp driver) आणि एका कारचालकाचा बुधवारी पूरम चौकात (puram chowk) किरकोळ अपघात झाला. यामुळे कारचालकाने पीएमपी चालकाच्या डोक्यात दगड घातला. याबाबत पीएमपीचे चालक शशांक यादवराव देशमाने (Shashank Yadavrao Deshmane) (वय 52, रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

फिर्यादिप्रमाणे, स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) भाजपच्या माजी नगरसेविकेसह (BJP Ex corporator) चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये माजी नगरसेविका प्रतिभा ढमाले (Ex-Corporator Pratibha Dhamale), मुकेश पायगुडे (Mukesh paygude), महेश भरगुडे (Mahesh Bhargude) अन्य एक अशा चौघांचा समावेश आहे.

हेही वाचा - Pune news | शिवज्योत घेऊन निघालेल्या शिवभक्तांवर काळाचा घाला; ३५ जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, देशमाने हे स्वारगेट डेपोमध्ये कार्यरत आहेत. सकाळी ते स्वारगेट येथून बाजीराव रस्त्याने शनिवारवाड्याच्या दिशेने बस घेऊन जात होते. सकाळी 8.45 वाजता ते अभिनव कॉलेज चौकात आले असता, त्यांच्यापुढे असलेल्या चारचाकी वाहनाला पाठीमागून धक्का बसला. या वेळी चारचाकीमध्ये माजी नगरसेविका प्रतिभा ढमाले, पायगुडे आणि अन्य दोघे असे चौघे जण होते. त्यांनी खाली उतरून चालकाशी वाद घालून मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील एकाने रस्त्यावरील सिमेंटचा ब्लॉक उचलून चालकाच्या डोक्यात घातला. यात चालक जखमी झाला.

देशमाने यांना तत्काळ ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सायंकाळी त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि चौघांविरोधात गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे.

हेही वाचा - Pune Accident: तिरुपती बालाजीला जात असलेल्या पुण्यातील तरुणांच्या मोटारीचा बेंगलोर जवळ अपघात; एक जण ठार

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                          

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                  

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                  

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                 

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                  

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://s harechat.com/profle/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes               

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.