Checkmate Times,
Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 6 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पुणेकरांचा प्रवास सुखकर करणारी पीएमपीएमएल (PMPML) काही दिवस पुणेकरांचे हाल करण्याची शक्यता आहे. पुणेकरांना पीएमपीएमएल ठेकेदारांच्या संपाचा (PMPML Contractors on Strike) फटका बसण्याची शक्यता आहे. पीएमपीएमएल ठेकेदार आज दुसऱ्या दिवशीही संपावर ठाम आहेत. 3 महिन्यांची बिले थकल्यामुळे (unpaid dues) या ठेकेदारांनी संप पुकारला आहे. (pmp buses on strike pune breaking news)
हेही वाचा - येत्या १४ मार्चपासून राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
ओलेक्ट्रा (olectra), हंसा (hansa), अँथोनी (anthony), ट्रॅव्हल टाईम (Travel time) या चार ठेकेदारांनी संप पुकारला आहे. या ठेकेदारांच्या संपामुळे फटका पुणेकरांना बसणार आहे. पुण्यातील मोठी सार्वजनिक वाहतूक यामुळे कोलमडण्याची शक्यता आहे. जवळपास 1100 बसेस यामुळे धावणार नसल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पीएमपीएमलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी ठेकेदारांना हा संप मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र ठेकेदार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ठेकेदारांनी अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही त्यांना वेळेवर थकबाकी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी संप पुकारला आहे.
हेही वाचा - पुण्यात संपानंतरही वीज पुरवठा सुरळीत राहील, कसे ते पहा
काल रविवारी (दि. 5 मार्च 2023) संध्याकाळी ठेकेदारांनी अचानक संपाचा निर्णय घेतल्यानंतर रस्त्यावर पीएमपीएमएल बस संख्या अचानक कमी झाली. पीएमपीएमएलकडे सध्या 2142 बसेस आहेत. यापैकी 1100 बसेस या ठेकेदारांच्या असून इतर 900 बसेस या पीएमपीच्या मालकीच्या आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84