Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 7 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): थकित बिलापोटी (bus strike today) 66 कोटी मिळाल्यानंतर पीएमपीच्या चार कंत्राटदाराने (Contractors) सोमवारी रात्री अखेर संप मागे घेतला. दोन दिवस चाललेल्या या संपात सुमारे आठ लाख प्रवाशांना फटका बसला. उर्वरित रक्कम देखील लवकरच दिली जाणार आहे. मंगळवार पासून ‘पीएमपी’ची बस सेवा (PMP Bus Service) पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. संप मिटल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. (The strike was called off by bus contractors in pune)
पीएमपीच्या चार कंत्राटदारांचे चार महिन्यांचे 99 कोटी रुपयांचे बिल थकल्याने रविवारी दुपारपासून त्यांनी संप सुरु केला. संपात सुमारे 907 बस सहभागी झाल्याने रविवारी व सोमावरी मोठ्या प्रमाणात ‘पीएमपी’ची प्रवासी सेवा बाधित झाली होती. सोमवारी पुणे (PMC) व पिंपरी चिंचवड महापालिकेने (PCMC) 90 कोटी रुपये पीएमपी प्रशासनाला दिले.
संपात ओलेक्ट्रा (Olectra), ट्रॅव्हल टाइम (Travel Time), अँथनी (Anthony) व हंसा (Hansa) या चार कंत्राटदारांनी सहभाग नोंदविला होता. यात पुणे महापालिकेने (PMC) 54 कोटी तर पिंपरी चीचवड महापालिकेने (PCMC) 36 कोटी रुपये दिले. त्यापैकी कंत्राटदारांचे 66 कोटी रुपये देण्यात आले. तर 24 कोटी रुपये हे 'एमएनजीएल'चे (MNGL) देण्यात येणार आहे. कंत्राटदारांचे नोव्हेंबर ते फेब्रुवारी असे चार महिन्यांचे बिल थकले होते. पैकी नोव्हेंबर ते जानेवारी असे तीन महिन्यांचे बिल सोमवारी देण्यात आले.
हेही वाचा - Pmpml Strike: आज पुण्यात जवळपास १ हजार बस कमी धावणार; पीएमपी ठेकेदार कंपन्यांनी पुकारला संप
‘पीएमपी’ची बस सेवा पूर्ववत व्हावी याकरिता सोमवारी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पीएमपीचे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांची भेट घेऊन चर्चा केली. यात आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (BJP city president Jagdish Mulik) यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांचे शिष्ट मंडळ, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP city president Prashant Jagtap), प्रवक्ते प्रदीप देशमुख (Spokesperson Pradeep Deshmukh), संतोष नांगरे (Santosh Nangare) आदींनी देखील भेट घेऊन संपावर तोडगा काढण्याची मागणी केली होती.
“वेतन थकल्याने चार कंत्राटदारांनी संप केला होता. सोमवारी थकित रकमेतील 66 कोटी रुपये देण्यात आले. मंगळवार पासुन बस सेवा पूर्ववत होईल.” असे पुण्यातील पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया (Omprakash Bakoria, Chairman and Managing Director of PMPML, Pune) म्हणाले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84