Type Here to Get Search Results !

Pune Crime News: विनापरवाना पिस्तुल बाळगणाऱ्या दोघांना पकडण्यात कोथरूड पोलिसांना यश

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

kothrud police seize pistol from 2 people - checkmate times

पुणे, दि. 15 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): बेकायदा पिस्तूल (Pistol) बाळगणार्‍या दोघा सराईत गुंडांना कोथरुड पोलिसांनी (Kothrud police) अटक केली. आरोपींकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. (Pune Crime News)

वैभव रामभाऊ तावरे (Vaibhav Rambhau Taware) (23, रा. भोसले हाईट्स, धायरी), आदित्य प्रकाश वाटविसावे (Aditya Prakash Vatvisave) (23, रा. वाटविसावे चाळ, धायरी फाटा, वडगाव खुर्द) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तावरे हा सराईत गुन्हेगार (Criminal) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान तावरे त्याच्या साथीदारासह कोथरूड भागात थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती अंमलदार अजिनाथ चौधर (Janinath Chaudhar), संजय दहीभाते (Sanjay Dahibhat) यांना मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात एक पिस्तूल व काडतूसे आढळून आली.

हेही वाचा - गावठी कट्टा बाळगणाऱ्या परराज्यातील तरुणासह दोघे गजाआड

सहायक पोलीस आयुक्त रुक्मीणी गलांडे (Assistant Commissioner of Police Rukmini Galande), कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Kothrud Police Station Senior Police Inspector Hemant Patil), गुन्हे निरीक्षक बाळासाहेब बडे (Crime Inspector Balasaheb Bade) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बसवराज माळी Sub-Inspector Basavaraj Mali), अंमलदार शरद राऊत (Sharad Raut), योगेश सूळ (Yogesh Sul), अजय शिर्के (Ajay Shirke), आकाश वाल्मिकी (Akash Valmiki) यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा - पुणे शहर पोलिसांवर हल्ला करून पसार झालेला आरोपी टेंभूर्णी मध्ये पकडला

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                          

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                    

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                  

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                  

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                 

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://s harechat.com/profle/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes               

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.