Type Here to Get Search Results !

'धर्मवीर'ने माझं आयुष्यच बदललं आणि महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता बनवले : प्रसाद ओक

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 1 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): झी टॉकीज (Zee Tolkies) ही वाहिनी नेहमीच कलाकार आणि प्रेक्षक यांची नाळ जोडण्यासाठी पुढाकार घेत आली आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणजे ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ (maharshtracha favorite kon award) हा पुरस्कार सोहळा. महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात कोणत्या कलाकाराने स्थान मिळवलं हे दाखवणारा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ हा पुरस्कार झी टॉकीज या वाहिनीच्या वतीने दिला जातो. वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांकडूनच पसंतीचा कौल विचारून, प्रेक्षकांनीच दिलेल्या मतांमधून महाराष्ट्रातील फेवरेट कलाकार (actor) आणि सिनेमा (cinema) निवडला जातो त्यामुळेच प्रेक्षकांनाही आपल्या आवडीचा कलाकार झी टॉकीज वाहीनीचा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण' हा पुरस्कार घेताना पाहण्याचं पाहण्याचा एक वेगळाच आनंद मिळत असतो. रविवार दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 1 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता हा दिमाखदार सोहळा पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. (pune news)

यावर्षीही झी टॉकीज वाहिनीच्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण या पुरस्काराची उत्सुकता संपत असून रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता हा दिमाखदार सोहळा पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. यावर्षी 12 विभागातून प्रेक्षकांनी निवडलेल्या कलाकारांना आणि उत्कृष्ट सिनेमाला महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा किताब बहाल करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा, अभिनेता, अभिनेत्री, खलनायक, खलनायिका, सहाय्यक अभिनेता, सहाय्यक अभिनेत्री, संगीतकार, गायक, गायिका, याचबरोबर महाराष्ट्राचा ‘पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ (popolar face of the year) आणि ‘स्टाईल’ (style) हे दोन विशेष पुरस्कार झी टॉकीज वाहिनीच्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण या सोहळ्याच्या मंचावर दिले जाणार आहेत.

आजपर्यंत सिनेमात राजकीय विषय अनेक निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी हाताळला आहे. यामध्ये गेल्यावर्षी पडद्यावर आलेला शिवसेना नेते आनंद दिघे (Shiv Sena leader Anand Dighe) यांच्या जीवनपटावर बेतलेला ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ (dharmavir mukkam post thane) हा सिनेमा. या सिनेमात आनंद दिघे यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आलेल्या अभिनेता प्रसाद ओक (actor Prasad oak) याने अफलातून किमया केली. प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या व्यक्तीवर सिनेमा बनवणे हे आता काही नवीन नाही पण ती व्यक्तिरेखा अगदी हुबेहूब साकारणं हे नक्कीच प्रसाद ओक याच्यासमोर आव्हान होतं आणि ते आव्हान त्याने लिलया पेललं. त्याची पोचपावती या सिनेमाने केलेल्या रेकॉर्डब्रेक कमाईने दाखवून दिलीच पण आनंद दिघे या भूमिकेसाठी प्रसाद ओक याने घेतलेली मेहनत यावर देखील प्रेक्षकांनी त्यांच्या पसंतीची मोहर उमटवली .

प्रसाद ओक म्हणाला,”ही भूमिका जेव्हा मला ऑफर करण्यात आली तेव्हा मला स्वतःलाही या भूमिकेचा डोलारा मी पेलू शकेल की नाही याबाबत साशंकता होती. आनंद दिघे यांचा जीवनपटाचा आलेख फार मोठा आहे. त्यांचे बारकावे अभिनयातून साकार करण्यासाठी माझ्यातला अभिनेता अजून कसदार झाला याचा मला विशेष आनंद आहे. आनंद दिघे यांच्या सहवासातील अनेक व्यक्तींनी जेव्हा मला दिघे साहेबांच्या लुकमध्ये पाहिलं तेव्हा त्यांनाही क्षणभर आपल्यासमोर आनंद दिघे साहेबच उभे आहेत असं वाटलं यातच या व्यक्तिरेखेसाठी केलेल्या लुकचं सार्थक आहे. पण लुक बरोबरच आनंद दिघे ही व्यक्तिरेखा पडद्यावर उभी करणे हे माझ्यातल्या अभिनेत्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं . ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाला मिळालेलं यश, हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला याची मिळालेली पावती आणि त्यावर आता झी टॉकीज या वाहिनीच्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण या प्रेक्षकांनीच दिलेल्या मतांमधून मला मिळालेला महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता हा पुरस्कार हे सगळेच माझ्या अभिनेता म्हणून प्रवासातील माईल स्टोन आहे असं मला वाटतं.” रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता हा दिमाखदार सोहळा पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे तेव्हा नक्की पहा!

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n     

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.