Type Here to Get Search Results !

Pravin Tarde: प्रविण विठ्ठल तरडे यांचा कला जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

parvin tarde get Art Jeevan Gaurav Award  - checkmate times

पुणे, दि. 14 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): यशवंतराव चव्हाण (Yashwantrao chavhan) यांनी आयुष्यात संस्कार, नीतिमूल्य आणि संस्कृती जोपासली. त्यांच्या नावाचा हा पुरस्कार जबाबदारी वाढवणारा असल्याची भावना दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे (Director and Actor Pravin Tarde) यांनी व्यक्त केली. (pravin tarde news)

स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट (Prakash Dhere Charitable Trust) व गंगालॉज मित्र मंडळातर्फे (Gangalodge Mitra Mandal) यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त (yashwantrao chavhan birth anniversary) तरडे यांना प्रकाश ढेरे स्मृतिप्रित्यर्थ ‘कला जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड (MIT World Peace University Founder-Chairman Dr. Vishwanath Karad) यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. सत्कारानंतर राज्यभरातून आलेल्या कवींचे कवी संमेलन रंगले. गझल, प्रेमगीते, विडंबन कवितांनी हे संमेलन उत्तरोत्तर रंगत गेले. रामदास फुटाणे (Ramdas Futane) व अशोक नायगावकर (Ashok Naygavkar) यांनी कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केले.

याप्रसंगी जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर, ट्रस्टचे विश्वस्त विजय ढेरे आदी उपस्थित होते. या वेळी वर्जेश सोलंकी, आबा पाटील, नितीन देशमुख आणि हर्षदा सुंठणकर या कवींचा साहित्य पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

हेही वाचा - महिलांचा सन्मान म्हणजे संस्कृतीचा गौरव : वि.दा. पिंगळे

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                         

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                 

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n     

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes                

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84     

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.