Checkmate Times, Pune City, Pune District, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news, pune rain, electricity supply
पुणे, दि. 7 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): वडगाव शेरी (Vadgaon Sheri) येथील दाट लोक वस्तीच्या त्र्यंबकेश्वर सोसायटीतील (Traymbakeshwar Society) नारळाच्या झाडावर काल सायंकाळी वीज कोसळली. (lightning struck) वीज कोसळल्यानंतर नारळाच्या झाडाने पेट घेतला. वीज कोसळण्याच्या घटने वेळी विजेचा दाब वाढल्याने परिसरातील काही टीव्ही, फ्रीजही जळाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. (Pune Rain)
वडगाव शेरी, विमाननगर (Vimannagar), नगर रस्ता (Nagar Road) परिसरात सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. यावेळी वडगाव शेरी येथील त्र्यंबकेश्वर सोसायटीतील नारळाच्या झाडावर वीज पडून नारळाच्या झाडाने पेट घेतला. वीज कोसळताना मोठा आवाज झाला. नारळाच्या झाडाने पेट घेतल्याने अग्निशामक दलाला (Fire Station) माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाने जागेवर येऊन आग विझवली. वीज पडली त्यावेळेस वीज पुरवठाही (Electricity Supply) खंडित झाला.
परंतु त्यावेळी विजेचा दाब वाढल्यामुळे काही टीव्ही, फ्रीज जळाल्याची माहिती स्थानिक रहिवासी प्रल्हाद कुदळे (Pralhad Kudale) यांनी दिली. दाट लोकवस्तीच्या या भागात घडलेल्या या अनपेक्षित घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84