Type Here to Get Search Results !

Pune News: मेट्रोच्या कामामुळे आजपासून वाहतुकीत बदल; आज घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

pune route changes today - checkmate times

पुणे, दि. 31 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): शहरातील कोरेगाव पार्क (Koregaon park) वाहतूक विभागाच्या हद्दीत मेट्रोतर्फे सिव्हिल कोर्ट (Civil Court) ते रामवाडीदरम्यान (Ramwadi) पुणे मेट्रो रिच - 3 या मार्गिकेवर बंडगार्डन (bandgarden) येथे मेट्रो स्टेशनच्या (metro station) स्टील गर्डरचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार (दि. 31 मार्च 2023) पासून 21 एप्रिल 2023 पर्यंत रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहील.

तसेच, एन. एम. चव्हाण चौक (N M Chavhan Chowk) ते अॅडलॅब चौकदरम्यान (Adlab Chowk) महामेट्रोचे कल्याणीनगर रेल्वे स्टेशनचे (Kalyaninagar Railway Station) काम सुरु आहे. त्यासाठी 27 जून 2023 पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (Vijay Kumar Magar, Deputy Commissioner of Police, Traffic Branch) यांनी दिली.

येरवडा विभाग (Yerwada), वाहतुकीतील बदल

एन. एम. चव्हाण चौकाकडून अॅडलॅब चौकाकडे जाणारी वाहतूक तसेच अॅडलॅब चौकाकडून एन. एम. चव्हाण चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार गरज पडल्यास बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग -

1) ए. बी. सी. चौकाकडून येणारी वाहतूक एन. एम. चव्हाण चौकातून डावीकडे वळून कल्याणीनगर लेन क्रमांक 3 येथून उजवीकडे वळून अॅडलॅब चौकाकडे जाईल.

2) बिशप स्कूलकडून (Bishop School) एन. एम. चव्हाण चौकाकडे जाणारी वाहतूक गोल्ड अॅडलॅब चौकातून उजवीकडे वळून कल्याणीनगर लेन क्रमांक 7 येथून डावीकडे वळून एन. एम. चव्हाण चौकाकडे जाईल.

हेही वाचा - प्रशासक राज मुळे नदीपात्र रस्त्यातील अडथळा दूर करत, रस्ता झाला खुला

कोरेगाव पार्क विभाग, वाहतुकीतील बदल-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतूवरुन तारकेश्वर चौकाकडे जाणारी वाहतूक रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहील. (babasaheb aambedkar setu to Tarkeshwar)

पर्यायी मार्ग -

1) पुणे स्टेशनकडून (Pune Station) येऊन बोटक्लबकडे (Bot Club) जाणारी वाहने मोबाज चौक, डावीकडे वळून ढोले-पाटील रोडने इच्छितस्थळी जातील.

2) पुणे स्टेशनकडून येऊन येरवड्याकडे जाणारी वाहने मोबाज चौक, मंगलदास रोडने, ब्ल्यू डायमंड चौक, कोरेगाव पार्क जंक्शन, पर्णकुटी चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.

3) येरवडा येथून पुणे स्टेशनकडे जाणारी वाहने पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, कोरेगाव पार्क जंक्शन, ब्ल्यू डायमंड चौकातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जातील.

4) बोटक्लब रोडने येऊन येरवड्याकडे जाणारी वाहने श्रीमान चौकातून सरळ अमृतलाल मेहता रोडने कोरेगाव पार्क चौकातून इच्छितस्थळी जातील.

हेही वाचा - पीएमपीएमएल’ची ५ रुपयात ५ किलोमीटर बससेवा बंद; पुण्यादशम पण लवकरच बंद होणार?

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes               

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes               

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/          

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                     

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes          

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n          

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.