Type Here to Get Search Results !

दीड हजारांसाठी एकाचा गेला जीव; भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील खतरनाक घटना

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 1 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): जबरदस्तीने पैसे काढून घेणाऱ्या दोघांना प्रतिकार केल्याने एका तरुणाला जीव गमवावा लागला. दोघांनी त्याला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (bharati vidyapeeth police) एका सराईत गुन्हेगारास त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. (pune crime news)

हा प्रकार पुणे सातारा रोडवरील (Pune Saara Road) गुडलक मोटर्स, हेमी प्लाझा (Goodluck Motors Hemi Plaza) येथे शुक्रवारी (दि. 24 फेब्रुवारी 2023) मध्यरात्री तीन वाजता घडला. महादेव नागनाथ चेंडके (Mahadev Nagnath Chendke) (वय 22, रा. खोपडेनगर, कात्रज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सराईत गुन्हेगार प्रदीप हिरालाल शिंदे (Pradeep Hiralal Shinde) (वय 19 रा. कात्रज, मूळ गाव आष्टी, श्रीगोंदा) याला अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्ती रस्त्यावर मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. शवविच्छेदन अहवालात मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.

त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ (Assistant Police Inspector Amol Rasal), पोलीस अंमलदार अभिजीत जाधव (Abhijit Jadhav), अवधूत जमदाडे (Avdhoot Jamdade), सचिन सरपाले (Sachin Sarpale), हर्षल शिंदे (Harshal Shinde), धनाजी धोत्रे (Dhanaji Dhotre) यांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) तपासले, त्यावेळी आरोपींची माहिती मिळाली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी पैशांसाठी महादेव याला अडवले. त्याच्याकडून जबरदस्तीने पैसे काढून घेत असताना महादेवने प्रतिकार करताच आरोपींनी त्याला मारहाण करून त्याचा खून केला. (Pune Crime News)

महादेव चेंडके हा इलेक्ट्रिकलची कामे करत होता. शुक्रवारी रात्री तो सातारा रस्ता परिसरात मद्यपान करण्यासाठी आला होता. दरम्यान, त्याने ‘गुगल पे’च्या (Google Pay) सहाय्याने व्यवहार केला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी नोडल अधिकाऱ्यांशी चर्चा करून मेलवरून पत्रव्यवहार करून तत्काळ गुगल आयडीवरून व्यवहार करणाऱ्या व्यक्तीचे नाव निष्पन्न केले. त्यावरून तपास करणे सहज शक्य आणि खुनाची उकल करण्यात मदत झाली. शिंदे हा श्रीगोंदा (Shreegonda) येथे राहत असून तो त्याच्या अल्पवयीन साथीदाराला भेटण्यासाठी पुण्यात आला असता पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n     

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.