Type Here to Get Search Results !

सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये रवींद्र धंगेकरांवर आणखी एक गुन्हा दाखल

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 1 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यातील कसबा पेठ निवडणूक (pune kasba peth election) सर्वच राजकीय पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. शिवाय मतदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांना (Congress candidate Ravindra Dhangekar) पैसे वाटपाचा आरोप करत उपोषण पुकारलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आज धंगेकरांवर पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आहे. (pune kasba by election)

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र धंगेकर यांनी शेअर केलेल्या फ्लेक्सवरुन थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच पुण्यातील वडगाव (Vadgaon) भागात धंगेकर यांच्या विजयाचे फ्लेक्स लावण्यात आले होते.

याविरोधात पुणे महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने (PMC Skysign and License Department) तक्रार दिली. दाखल तक्रारीनुसार आता पोलिसात याप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे.

वडगाव या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांची आमदारपदी निवड झाल्याचे फ्लेक्स झळकले होते. शहर विद्रूपीकरण केल्या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) राहुल मानकर (Rahul Mankar) आणि अतुल नाईक (Atul Naik) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n     

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.