Type Here to Get Search Results !

Rupali Chakankar: महिलांचे निम्मे प्रश्न संपलेले असतील, जेव्हा ते समजून घेतील; रुपाली चाकणकर यांचे प्रतिपादन

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

rupali chakankar encourages woman to take stand - checkmate times

पुणे, दि. 21 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): महिलांचे प्रश्न जेव्हा पुरुष समजून घेतील आणि ते सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, तेव्हा महिलांचे निम्मे प्रश्न संपलेले असतील. राज्य महिला आयोग म्हणजे पुरुषांच्या विरोधातच असा अनेकांचा समज होतो, परंतु आमची लढाई समाजाच्या विकृतीच्या विरोधात आहे. अन्याय करणाऱ्यांपेक्षा सहन करणारा जास्त दोषी असतो. प्रत्येक वेळेला तुमच्या मदतीला कोणी येईल ही भावना महिलांनी काढून टाका, आयुष्याची लढाई स्वतःचलढायची आहे. मातीत घट्ट पाय रोवून उभे राहा आणि संकटांचा सामना करा, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Chairperson of Maharashtra State Commission for Women Rupali Chakankar) यांनी केले.

इच्छाशक्ती व्यासपिठाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त (First Anniversary of Ichshashakti Vyaspith) आयोजित, कर्तुत्वान महिलांचे सन्मान पुरस्कार (Honoring women of merit) तसेच व्यावसायिक महिलांच्या वस्तूं, फुडचे विक्री स्टॉल्स आणि ब्रायडल मेकअप (Bridal makeup), ब्रायडल मेहंदी (Bridal Mehndi), रांगोळी (Rangoli), पाककला (Recipe), रॅम्प वॉक (Ramp Walk), थीम उखाणे, ऑल मॅचिंग, लकी ड्रॉ, प्रश्नोत्तरे स्पर्धा अश्या विविध स्पर्धा कात्रज मधील दत्तनगर (Datta Nagar, Katraj) मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या ॲड. रूपाली पाटील (Adv Rupali Patil), माजी नगरसेविका रुपाली धाडवे (Rupali Dhadave), वैशाली पाटील (Vaishali Patil), डॉ. शीतल कल्याणे (Dr Sheetal Kalyane), डॉ. अंकिता धोका (Dr. Ankita Dhokha), गौरी जाधव (gauri Jadhav), गीतांजली जाधव (gitanjali Jadhav), पल्लवी प्रसाद जगताप (Pallavi Jagtap), प्राजक्ता श्रीकांत लिपाणे (Prajakta Lipane) यांच्या हस्ते कर्तुत्ववान महिलांचे सन्मान करण्यात आले. त्याचबरोबर मीनाक्षी ओझा, सुशील पटेल, क्षितिज पटेल यांचाही सन्मान करण्यात आला होता. आयोजन किशोरी गोरख सांगळे यांनी केले होते.

हेही वाचा - महिला आयोग आपल्या दारी; राज्य महिला आयोगाची पुण्यात जनसुनावणी

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.