Type Here to Get Search Results !

Vasant More | मुस्लीम मुलीशी लग्नाचे प्रमाणपत्र व्हायरल करण्याची धमकी देत मागितली खंडणी; वसंत मोरे यांची पोलिसात तक्रार

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 7 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यातील मनसे नेते माजी नगरसेवक वसंत मोरे (MNS Leader, Former Corporator Vasant More) यांच्या मुलाला मुस्लीम मुलीशी लग्न केल्याचे बनावट प्रमाणपत्र (Marriage Certificate) व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी (Vasant More Extortion case) मागून, न दिल्यास जीवे मारण्याची धमकी (Death threats) दिल्याची माहिती समोर आली आहे. वसंत मोरे यांनी भरती विद्यापीठ पोलिसात (Bharti Vidyapith Police) तक्रार दिली आहे. मात्र वसंत मोरे यांच्या मुलाला (Rupesh More) धमकी आल्याची माहिती पसरताच कात्रजच (Katraj Pune) नव्हे तर पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (vasant more son rupesh more threatened for spreading rumours for fake marriage with muslim girl)

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वसंत मोरे यांचा मुलगा रूपेश मोरे यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. “30 लाख दे नाहीतर मुस्लीम मुलीसोबतच्या लग्नाचे बनावट प्रमाणपत्र (Fake Marriage Certificate) व्हायरल करण्यात येईल.” अशा आशयाचा मेसेज त्यांना आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन (Bharti Vidhyapith Police Station) मध्ये संबंधित मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - "साहेब तुम्ही बसा मी मागे आहे"; वसंत मोरे यांच्या खांद्यावर हात टाकून राज ठाकरेंनी दिल्या पोज

रुपेश मोरे यांच्या व्हाट्सअप मोबाईलवर अन्फिया शेख (Anfia Shaikh) या मुली सोबत विवाह झाला आहे, असा दावा करण्यात आला आहे. ग्रामसेवक ग्रामपंचायत वडगाव (Gram Panchayat Vadgaon), तालुका सोयगाव (Taluka Soygaon), जिल्हा छत्रपती संभाजी महाराज नगर (जुना औरंगाबाद) (District Chhatrapati Sambhaji Maharaj Nagar (Old Aurangabad)) येथील बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र (Marriage Registration Certificate) पाठवून “हमने आपके नाम का मॅरेज सर्टिफिकेट बनाया है | खराडी आयटी पार्क (Kharadi IT Park) के सामने गाडी मे बीस लाख रुपये रख देना | नही तो आपके उपर रेप के केस (Rape Case) कर देंगे” असा धमकीचा मेसेज (Threat SMS) रुपेश मोरे यांना करण्यात आला आहे.

त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एक मेसेज आला “मै अल्फिया शेख, 30 लाख रुपये नही दिये तो रेप के केस मे अंदर कर दुंगी |” अशा पद्धतीचा मेसेज पाठवला गेला. पुन्हा काही दिवसानंतर “दे रहा है क्या पैसा? नही तो मार दूंगा | तेरी पुरी सेटिंग हुई है | बहुत जल्द मार देंगे तेरे को | गोली मार के जायेंगे | तेरे बाप को बोल देंगे, तेरे को बचाने के लिए |” असा धमकीचा मेसेज करून 30 लाख रुपयांची मागणी केली आहे.

यापुर्वीही रुपेश मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीने रूपेश यांच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारवर एक चिठ्ठी ठेवण्यात आली होती. चिठ्ठीत “सावध रहा रूपेश” असा मजकूर लिहण्यात आला होता.

एकूणच केवळ कात्रज आणि पुणे शहरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात कडवट आणि निर्भीड मनसैनिक म्हणून ओळख असलेल्या माजी नगरसेवक वसंत मोरे (MNS Dashing Ex Corprator Vasant More) यांच्याबाबत अशाप्रकारची माहिती मिळाल्यानंतर एकाच खळबळ उडाली असून, संशयितांना कठोर शासन करण्याची मागणी होऊ लागली आहे. तर काही दिवसांपूर्वीच मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर (Attack on MNS Leader Sandeep Deshpande), कट्टर राज समर्थक (Raj Samarthak) असलेल्या वसंत मोरे यांच्या मुलाला टार्गेट केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes           

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/           

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times          

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes           

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes         

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n           

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes        

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.