Type Here to Get Search Results !

बाळूमामांच्या यात्रेत भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण; चांगभलं चा घुमतोय गजर

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news, balumama temple, halsiddhhanath balumama

 

पुणे, दि. 6 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): मुळक्षेत्र मेतके (ता. कागल) (Metke, Kagal) या सदगुरु बाळूमामा (Sadguru Balumama) यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गावात हालसिध्दनाथ-बाळूमामा भंडारा उत्सवाला (balimama temple) भाविकांची मांदियाळी झाली आहे.

हा पालखी (balumama palkhi) सबिना याची देही याची डोळा पाहण्यासाठी गेल्या सात दिवसापासून सुरू असणाऱ्या या भंडारा उत्सवासाठी महाराष्ट्रासह (maharashtra) कर्नाटक (karnatak), गोवा (goa) सीमाभागातून दीड लाखाहून अधिक भाविक दाखल झाले होते. माघ पौर्णिमेला या भंडारा उत्सवाला बाळूमामांनी परिसरातील चाळीस गावातील नागरिकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. तोच भंडारा आजही भाविक श्रद्धापुर्वक अमाप उत्साहात साजरा करतात.

काकड आरती, प्रवचन, किर्तन, ज्ञानेश्वरी पारायण, भजन व वालंग (ढोल वादन) यामुळे सात दिवसापासून या पवित्र चिकोत्रा नदीतीरावर भावभक्तीचा मेळाच जमला होता. शुक्रवारी सायंकाळी नाथांचे भक्त भगवान डोणे-वाघापुरे यांचे आगमन झाले. ‘सदगुरु बाळूमामांच्या नावानं चांगभलं....श्री हालसिध्दनाथ महाराज की जय...’ असा अखंड नामघोष ढोल, कैताळाचा निनाद, पालखी सोहळा पाहून हजारो भाविक आत्मतृप्त झाले. भंडाऱ्याच्या उधळणीत भाविक नाहून गेले होते. मंदिर परिसर पिवळा जर्द झाला होता.

यावेळी गावच्या मुख्य चौकात बिरदेव व बाळूमामा यांच्या पालखीच्या गाठीभेटी झाल्या. तसेच, मिरज (Miraj), बेडग (Bedag), टाकळी (Takli), मालगांव (Malgaon), उदगाव (Udgaon), शिरोळ (Shirol), उमळवाड (Umalwad), टोप (Top), पेठवडगाव (Pethwadgaon), घुणकी (Ghunaki), म्हाकवे (Mhakave), कुर्ली (Kurli), हमिदवाडा (Hamidwada), मिणचे (Minache), सावर्डे (Savarde), कारदगा (Kardaga) आदी गावातील वालंगे समाजही दाखल झाला होता.

पालखी पुजन व देवाचा सभिना, तसेच धनगरी ढोलाचा वालंग व हेडाम खेळण्यात आले. तसेच, सकाळी ज्ञानेश्वरी पारायणची सांगता झाली. तर, महानैवेद्य होवून सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप झाले. सायंकाळी दिंडी सोहळा होवून भंडारा उत्सवाची सांगता झाली. रात्री उशिरापर्यंत भाविक परतत होते. या भंडारा उत्सवाला भावभक्तीची किनार असल्याने मोठी गर्दी होते.

सीमाभागातून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये, यासाठी सद्गुरू बाळूमामा चँरिटेबल ट्रस्टने नेटके नियोजन केले. तर सर्व भाविकांना महाप्रसादाचा व्यवस्थित लाभ घेता यावा यासाठी तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने परिश्रम घेतले.

हेही वाचा - सायकलस्वाराच्या वेशात पुण्यातले वारकरी पंढरपूरात; पायी वारी ऐवजी केली सायकल सवारी, वाचा त्यांच्या प्रवासाची दुनियादारी

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes           

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/           

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times          

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes           

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes         

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n           

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes        

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.