Type Here to Get Search Results !

Sanjay More: कसब्यातील पराभवामुळे भाजपा’ला मिळकत कराचा मुद्दा आठवला; शिवसेनेची जहरी टीका

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news


पुणे, दि. 9 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पुणेकरांवर लादण्यात आलेल्या मिळकतकराच्या समस्येकडे गेल्या अनेक महिन्यांपासून सत्ताधारी शिवसेना (Shivsena) आणि भाजपकडून (BJP) दुर्लक्ष केले जात होते. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे होणाऱ्या बैठकीला मुहूर्त लागत नव्हता. मात्र, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Kasba Election) पराभव झाल्यानंतर भाजपला लगेच मिळकतकराचा (Taxes) मुद्दा आठवला आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. शहर प्रमुख संजय मोरे (Shiv Sena city chief Sanjay More) यांनीही टीका केली.

पुणे महापालिकेने मिळकत करातील 40 टक्के सवलत रद्द केली. 2019 पासूनच्या सवलतीची रक्कम 2022-23 यावर्षीच्या बिलामधे आकारल्याने नागरिकांमधे नाराजी असल्याचे शिवसेना पुणे शहराचे वतीने 8 जून 2022 रोजी तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथजी शिंदे यांना समक्ष भेटून लेखी पत्राद्वारे निवेदन दिले होते. आजपर्यंत काहीच निर्णय घेतला नाही.

मागील 8 महिन्यापासून यांचे सरकार असूनही याबाबत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला पुणेकरांच्या वाढीव मिळकत कराबाबत काही देणेघेणे नाही आणि नव्हते. परंतु कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत मविआ कडून सडकून पराभव झाल्यानंतर या दोन्ही पक्षांमधील पुतना मावशीचे प्रेम जागे झाले.

हेही वाचा - कात्रज चौकातील समस्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी; स्थानिक नागरिकांची घेतली भेट

याबाबत “नागरिकांनी झिडकरल्यानंतर यांना मिळकत कर आठवला. आठ महिन्यापासून शांत का बसले याचे उत्तर अगोदर यांनी द्यावे. पुणेकर नागरिक सुजाण आहेत. त्यांना चांगले माहिती आहे. मागील जूनमधे शिवसेनेने हा प्रश्न नगरविकास मंत्र्यांकडे मांडला. परंतु तेव्हा ते पुढच्या फुटीच्या प्लॅनिंगमधे व्यस्त असल्याने नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता, पण आता कसब्याच्या निवडणुकीत पराभव झाल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला आहे.” अशी टीका मोरे यांनी केली.

हेही वाचा - राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारमधून मंत्रालय ते ठाणे प्रवास

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/              

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times             

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes              

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes            

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n               

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes           

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.