Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 28 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज (Sadguru Mata Sudikshaji Maharaj) यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील काळेवाडी पिंपरी ब्रांच यांच्या वतीने ‘संत निरंकारी मिशन’ची सामाजिक शाखा आणि ‘संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशन’द्वारा (Sant Nirankari Charitable Foundation) विशाल रक्तदान शिबिराचे (Blood Donation Camp) आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर 26 मार्च 2023 रोजी संत निरंकारी सत्संग भवन, विजयनगर, काळेवाडी (Sant Nirankari Satsang Bhawan, Vijaynagar, Klaewadi) येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी) (Tarachand Karamchandani) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. दरम्यान या रक्तदान शिबिराला अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरात 383 श्रद्धाळू भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले. यामध्ये यशवंतराव चव्हाण रक्तपेढी (Yashwantrao Chavhan Blood Bank) यांनी 163 युनिट, ससून रुग्णालय रक्तपेढी (Sasoon Hospital Blood Bank) यांनी 100 युनिट, संत निरंकारी रक्तपेढी (Sant Nirankari Blood Bank) यांनी 120 युनिट रक्त संकलन केले. या रक्तदान शिबिरात महिलांचे योगदान पुरुषांपेक्षा तुलनेत जास्त असल्याचे पाहायला मिळाले.
संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली (Delhi) येथे नोव्हेंबर 1986 मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते, ज्याचे उदघाटन बाबा हरदेव सिंहजी महाराज (Baba Hardev Singhji Maharaj) यांनी केले होते. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि 'रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे'. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे. ही मोहीम मिशनच्या अनुयायांद्वारे मागील 37 वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून त्यात आतापर्यंत 7478 रक्तदान शिबीर संपन्न झाली असून 12,33,178 युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे.
संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजित करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार (Central Government) तसेच राज्य सरकारांद्वारे (State Government) मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा - Blood Donation: शहीद दिनानिमित्त सर परशुरामभाऊ महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादलचे क्षेत्रीय संचालक किशनलाल अडवाणी (Regional Director of Sant Nirankari Sevadal Kishanlal Advani) यांच्या मार्गदर्शनाखाली, मिशनचे सेवादार, अनुयायी यांनी योगदान दिले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आभार गिरधारीलाल मतनानी (Giridharlal Matnani) (पिंपरी सेक्टर प्रमुख) यांनी केले.
हेही वाचा - संत निरंकारी मिशनमार्फत अमृत परियोजने अंतर्गत ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियान
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84