Type Here to Get Search Results !

दाक्षिणात्य गायिका ‘मंगली’ने मराठीविश्वात रोवलाय झेंडा; पहा कधी आणि कसा ते...

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 1 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): प्रेमाच्या नावेचा संथ गतीने होणारा प्रवास अचानक आलेल्या वादळामुळे केव्हा नावेची दिशा भरकटवेल हे सांगता येणं कठीण. प्रेम ही भावना आहे आणि ती कधीही दुखावली जाऊ शकते, हे सांगणारी एक अनोखी कहाणी 'जैन फिल्म प्रॉडक्शन' (Jain Film Production) प्रस्तुत 'विरजण' (Virjan movie) या चित्रपटातून सिनेरसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच प्रेमालाही आहेत. प्रेम करणं ते टिकवणं आणि निभावणं या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत, याची जाणीव या चित्रपटातून अभिनेत्री शिल्पा ठाकरे (Actress Shilpa Thakre) आणि अभिनेता सोहम चाकणकर (Actor Soham Chakankar) यांची फ्रेशजोडी करून देणार आहे. (pune news)

नुकताच या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा (Music launch event) पुणे येथे पार पडला. सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिक (Famous music composer Anu Malik) यांच्या हस्ते या सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले. तर 'सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन'चे डॉ. संजय चोरडिया (Suryadatta Education Foundation's Dr. Sanjay Chordia), अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले (Akhil Bhartiya Chitrapat Mahamandal Chairman Meghraj Bhosale), महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे संचालक प्रवीणकुमार नाहटा (Maharashtra State Market Committee Director Praveen Kumar Nahata), प्रदीप नाहर (Pradeep Nahar), जुगराज जैन (Jugraj jain), महेंद्र पातारे (mahendra patare) तसेच 'विरजण' चित्रपटातील कलाकार आणि चित्रपटाची टीम यांनी सोहळ्याला उपस्थित राहून चारचाँद लावले.

कोणत्याही कलाकृतीला भाषा, प्रातं कशाचही बंधन नसतं असं म्हटलं जातं आणि याची पुन्हा एकदा नव्याने जाणीव तेलुगू गायिका सत्यावथी मंगली (Telegu Singer Satyavathi Mangali) हिने करून दिली आहे. 'विरजण' या चित्रपटातील 'देवा' या गाण्याला (virjan movie song deva) मंगलीने सुमधुर स्वरात स्वरसाज चढवलाय. 'देवा' या गाण्यामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मंगली गायन क्षेत्रातील नवीन आकर्षण बनली आहे. 'विरजण' चित्रपटातील 'देवा' या गाण्याला मंगलीने आवाज देऊन मराठी सिनेविश्वात नव्याने ठसा उमटविला आहे. या गाण्याची जबाबदारी मंगलीने उत्तमरीत्या पेलवली असून प्रशांत सातोसे (Prashant Satose) यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर या गाण्याचे बोल विनायक पवार (Vinayak Pawar) लिखित आहेत. दुर्गेश राजभट्ट (Music Producer Durgesh Rajbhatt) याने या गाण्याची म्युझिक प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे, तर संकेत टोळे (Sanket Tole) याने हे गाणं मिक्स अँड मास्टर्ड केले आहे. तर चित्रपटातील इतर गाणीही रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील यांत शंका नाही.

'देवा' या गाण्याला मिळालेल्या मंगलीच्या आवाजासह शिल्पा आणि सोहमची लव्हेबल केमिस्ट्री कशी असेल याचा अंदाज येतोय. 'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत निर्माते सागर जैन (Sagar Jain), ऋषभ कोठारी (Hrishabh Kothari), राजू तोडसाम (Raju Todsam) निर्मित आणि दिग्दर्शक कपिल जोंधळे (director Kapil Jondhale) दिग्दर्शित 'विरजण' हा चित्रपट असून या चित्रपटाची कथा लेखक नितीन सूर्यवंशी (Writer Nitin Survanshi) यांनी लिहिली आहे. तर चित्रपटाच्या संगीताची बाजू संगीतकार प्रशांत सातोसे यांनी सांभाळली आहे, तसेच या चित्रपटाचा उत्तम असा कॅनव्हास व्यंकेट कुमार (Vyanket kumar) यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

'तू आणि मी, मी आणि तू' हे नाव असलेला चित्रपट आता 'विरजण' या नावाने प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच चित्रपटाची कथा कुठे विरजण घालणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. तर चित्रपटातील गाण्यांनी ही उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n     

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.