Type Here to Get Search Results !

Mulshi Police Patil | पोलीस पाटलांना दिला मुळशी’च्या सुरक्षेचा चार्ज

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

mulshi news police patil

पुणे, दि. 10 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): “पोलीस पाटील हा गाव पातळीवरील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पोलीस व प्रशासनाला सर्वात जास्त मदत व सहकार्य हे पोलीस पाटलांकडून मिळते. त्याची सरकारने दखल घेऊन पोलीस पाटलांच्या मागण्या मान्य कराव्यात,” अशी मागणी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे (State President of Maharashtra State Village Workers Police Patil Association, Balasaheb Shinde) यांनी केली आहे. (Pune News)

पिरंगुट (ता. मुळशी) (Mulshi, Pirangut) येथे मुळशी तालुका पोलीस पाटील संघाच्यावतीने नूतनीकरण सनद वाटप व मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता. त्याप्रसंगी शिंदे बोलत होते. महाराष्ट्र राज्य संघटना पोलीस पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. नूतनीकरण व्यवस्था सुरळीतपणे पूर्ण करून जलद गतीने सर्व पोलीस पाटलांचे परवाने नूतनीकरण करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव (Senior Police Inspector Manoj Kumar Yadav of Paud Police Station) यांनी सांगितले की,”मुळशी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील हे उत्तमरीत्या काम करत असून त्यांचे आम्हाला कायम सहकार्य असते." सूत्रसंचालन संदेश हरगणे यांनी केले. रामदास मानकर यांनी आभार मानले. (Pune News)

यावेळी पौडचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, दादासाहेब काळभोर (Dadasaheb Kalbhor), गोरक्षनाथ नवले (Gorakshnath Navale), अरुण केदारी (Arun Kedari), निळकंठ थोरात (Nilkanth Thorat), साहेबराव राळे (Sahebrao Rale), लक्ष्मण शितोळे (Lakshman Shitole), हनुमंत हाडाळ (Hanumant Hadal) तसेच मुळशी तालुक्यातील सर्व आजी माजी पोलीस पाटील उपस्थित होते.

हेही वाचा - Mulshi Kitab Kusti | जिल्हास्तरीय ‘मुळशी किताब’ अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन; रविवारी अंतिम सामना

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                   

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                 

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                 

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                 

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes               

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes              

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.