Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 6 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): कराटेचे वर्ग घेणार्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Harrasment) केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व 17 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. (pune crime news)
हेही वाचा - आजोबा ना तुम्ही, मग हे काय केलंत?; "जब घर मे कोई नही होता था तब मुझे दादाजी गोद मे बिठाते थे"
असिफ रफिक नदाफ (Asif Rafiq Nadaf) (वय 31, रा. कोंढवा) असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार ऑगस्ट 2016 ते जानेवारी 2017 दरम्यान घडला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. साळुंखे (District and Sessions Judge S. B. Salunkhe) यांनी हा निकाल दिला.
हेही वाचा - कुंडलीत दोष असल्याने तरुणीचा लग्नास नकार, तरुणाकडून लैंगिक संबंधांची मागणी; पुन्हा शादी डॉट कॉम
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ही आरोपीच्या कोंढवा (Kondhawa) येथील कराटे क्लासमध्ये शिकत होती. या वेळी असिफ याने तिला “मला तू खूप आवडतेस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.” असे सांगितले. यादरम्यान त्याने तिला घरी नेले. त्यानंतर आई-वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. यामध्ये ती गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दिली. यादरम्यान तिला बाळही झाले.
दरम्यान, मुलीच्या आई-वडिलांची घरात सारखी भांडणे होत असल्याने मुलगी घाबरलेली असल्याने तिने कराटे शिक्षक त्रास देत असल्याचे घरात कोणाला सांगितले नव्हते. परंतु, ती गरोदर असताना हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणात सरकारी वकील प्रमोद बोंबटकर (Public Prosecutor Pramod Bombatkar) यांनी काम पाहिले. यामध्ये त्यांनी दोन साक्षीदार तपासले. या वेळी बचाव पक्षाने पीडितेच्या संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाले. तसेच, डीएनए अहवाल निगेटिव्ह असल्याचा दाखला देत बचाव केला. त्यावर पीडितेच्या वतीने अॅड. बोंबटकर यांनी युक्तिवाद करीत पीडिता ही गर्भवती होती. डीएनए अहवाल निगेटिव्ह आला असला तरी पीडितेने साक्ष नोंदविताना सर्व घटनाक्रम सांगितला आहे.
तसेच, पोलिसांसमोर जबाब, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यां समोरील कलम 164 चा जबाब व न्यायालयातील जबाब सुसंगत होता. घटनेच्या वेळी पीडिता अल्पवयीन होती. त्यामुळे तथाकथित संमती ग्राह्य धरता येणार नसल्याचे मत मांडले. न्यायालयाने ते ग्राह्य धरत शिक्षा सुनावली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84