Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 13 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): “छत्रपती शिवाजी महाराज जंयती नाचुन नाही वाचुन साजरी करा” हा संदेश देत कर्वेनगर मधील मोरया मित्र मंडळाच्या (Morya Mitra Mandal) वतीने कोथरूड, कर्वेनगर (Karvenagar) भागातील सामाजिक संस्था, मंडळे, पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि कर्वेनगर ते डेक्कन (Deccan) भागामधील सर्व शाळांमध्ये जाऊन डॉ. श्रीनिवास सामंत (Dr. Shrinivas Samanth) लिखित वेध महामानवाचा (Vedh Maha Manvacha), शिवराय: संस्कार आणि शिक्षण (Shivray Sanskar ani Shikshan) हे शिवचरित्र (Shiv Charitra) भेट देण्यात आले. (Pune News)
ह्या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक केदार मारणे (Kedar Marne) यांनी केले होते. यावेळी ते म्हणाले मोरया मित्र मंडळ सतत सामाजिक उपक्रम राबवत असते, गेल्यावर्षी पासून शिवाजी महाराज जयंती वाचुन साजरी करावी हि संकल्पना आली कारण शिवाजी म्हणजे,
शि - म्हणजे शिका
वा - म्हणजे वाचा
जी - म्हणजे जिंका
एकूणच शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिवाजी महाराज कळावे, म्हणून आम्ही हि पुस्तके त्यांच्या पर्यंत पोहचवत आहोत. आम्हाला शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) विचारांची पिढी निर्माण करायची आहे. त्यांच्यावर संस्कार व्हावेत म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहे, असेही मारणे यांनी यावेळी सांगितले.
या शिवचरित्र भारतीय इतिहास संशोधक मंडळ सभासद मंगेश नवघणे (mangesh Navghane) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु हाके (Senior PI Dagadu Hake), सहायक महापालिका आयुक्त वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय राजेश गुर्रम (Assistant Municipal Commissioner Rajesh Gurram), मंडळाचे उपाध्यक्ष रोहिदास जाधव (Board Vice President Rohidas Jadhav), ऋषी जगताप, देवेंद्र दांडेकर, अनिल आठवले, अथर्व भरम, निलेश भोईने, मुख्याध्यापक विठ्ठल शिंदे, उज्वला ढेरे, अनुया सायगावकर, संगीता कोरडे, स्वप्नील बराटे, मंदार कुंभार उपस्थित होते.
यावेळी,”शिवचरित्र हे प्रेरणादायी आहे. भविष्यात विद्यार्थी शिवचरित्र वाचणं केल्यानंतर जग जिंकल्या शिवाय राहणार नाही. मोरया मित्र मंडळाचा खूप छान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. असेच उपक्रम भविष्यात सर्व मंडळांनी राबविले पाहिजेत.” अशी अपेक्षा मंगेश नवघणे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - शिवजयंतीच्या कार्यक्रमात भाईजी’च्या कार्यकर्त्याची पोलिसांना धक्काबुक्की; गुन्हा दाखल
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84