Type Here to Get Search Results !

Pune Crime: 'ती'ने आत्महत्या केल्याच्या धक्क्याने तिच्या होणाऱ्या नवऱ्यानेही केली आत्महत्या

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

shocked by her suicide her future husband also committed suicide - checkmate times

पुणे, दि. 18 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): येरवड्यातील कल्याणीनगर (Kalyaninagar, Yerwada) भागात एका युवतीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. तिच्या मृत्यूच्या धक्क्याने तिच्या भावी पतीनेही पिंपरीतील खराळवाडी (Kharalwadi, pimpri) भागात आत्महत्या करून जीवन संपविले. पुढच्याच महिन्यात दोघांचे लग्न होणार होते.

अस्मिता परशुराम धोत्रे (Asmita Parshuram Dhotre) (रा. खराळवाडी, पिंपंरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत अस्मिताच्या आईने (वय 45) येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद (Yerwada Police Station) दिली आहे.

तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. येरवड्यातील कल्याणीनगर भागात अस्मिताने एका इमारतीतून उडी मारून 14 मार्च 2023 रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सुरुवातीला आकस्मित मृत्यू अशी नोंद केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अस्मिता ही पिंपरीतील खराळवाडी भागात राहायला आहे. तिचे लग्न एका तरुणाशी ठरले होते. 14 मार्च रोजी अस्मिता कल्याणीनगर भागात मित्रांना भेटायला आली होती. त्यानंतर तिने इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली. तिच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे भावी पतीनेही पिंपरीतील खराळवाडी भागात आत्महत्या केली, अशी माहिती येरवडा पोलिसांनी दिली.

तरुणीच्या नातेवाइकांनी मृतदेह येरवडा पोलीस ठाण्यात आणला. त्यानंतर पोलिसांनी अस्मिता हिच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या जॉनी कुरियन (Jonny Kurian), राजेश कांबळे (Rajesh Kambale), जनक शाही (Janak Shahi) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी आणि अस्मिता यांच्यात पैशांचा व्यवहार झाला होता. आरोपींनी पैशांचा तगादा लावल्याने मुलीने आत्महत्या केल्याचे धोत्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा - फायनान्स कंपनीत वसुली करणाऱ्याची आत्महत्या; या कारणामुळे दिला जीव

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                           

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.