Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 15 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): शिवसेनेचे माजी नगरसेवक (Ex Corporator Shiv Sena) आणि माजी नगराध्यक्ष श्याम देशपांडे (Shyam Deshpande) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP Pune) आपल्या कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP state president Chandrasekhar Bawankule), प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (BJP State General Secretary Muralidhar Mohol) हे यावेळी उपस्थित होते. त्यामुळे पुण्यातील शिवसेनेसह विशेषतः कोथरूडच्या शिवसेनेला (Shiv Sena Kothrud) हा धक्का मानला जात आहे. (Pune News)
श्याम देशपांडे (Sham Deshpande) हे 2012 ते 2014 या कालावधीत पुणे शहरामध्ये शिवसेनेचे प्रमुख (Shiv Sena Pramukh Pune) होते. गेल्या वर्षी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (Rashtriya Swayamsevak Sangha) टीका केल्यानंतर देशपांडे यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर त्यांनी लगेचच कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. त्यामुळे देशपांडे यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष्य लागले होते. अखेर देशपांडे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. ते भाजपा मध्ये जातील याबाबत चर्चा होत्या. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात ते जातील की काय अशाही शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
हेही वाचा - शेवटी फडणवीसांना “मनसे=मतदार नसलेली सेना” आणि “उनसे= उमेदवार नसलेली सेना” चा आधार घ्यावा लागला?
श्याम देशपांडे यांच्यासोबत विनोद गायकवाड, नारायण पाटील, समीर भट, अनिल हिंगमिरे, नामा देडे, महेंद्र आढाव, गोविंद चव्हाण, विजय कोलसे, तुषार गाढवे, अनिल मरळ, सुरेश कुलकर्णी या कार्यकर्त्यांनी सुद्धा श्याम देशपांडे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मागील बऱ्याच महिन्यांपासून शिवसेनेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकामागून एक नेते भाजपमध्ये किंवा शिंदेगटामध्ये सामील होत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - ऐन पोटनिवडणुकीत भाजपाच्या माजी नगरसेवकाचा पक्षाला राम राम
श्याम देशपांडे हे पुणे महापालिकेत शिवसेनेकडून दोन वेळा नगरसेवक होते. श्याम देशपांडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. श्याम देशपांडे यांच्या पत्नी संगीता देशपांडे (Sangeeta Deshpande) या दोन वेळा नगरसेविका सुद्धा होत्या. 2008 आणि 2009 मध्ये देशपांडे यांनी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष पद (PMC Standing Committee Chairman) देखील भूषवले होते. नुकतेच कसबा पोट निवडणूक (Kasba Vidhansabha by Election) पार पडली आहे. त्यात भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्या पार्श्वभूमीवर भाजपा’ने हे धक्कातंत्र अवलंबल्याचे दिसत असून, आता श्याम देशपांडे यांना भाजप नेमकी कोणती जबाबदारी देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शाम देशपांडे हे कट्टर शिवसैनिक होते. पण जेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं, तेव्हापासून श्याम देशापांडे यांच्यासारखे सच्चे शिवसैनिक दुखावले गेले. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयसेवक संघावर टीका केली. तेव्हा शिवसेना सोडणारे पहिले व्यक्ती श्याम देशपांडे होते. उद्धव ठाकरे जर संघावर टीका करत असतील, तर मी शिवसेनेत राहू शकत नाही, हे त्यांनी ठणकावून सांगितले होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://s harechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84