Checkmate Times,
Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 29 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): विमाननगरमधील (Vimananagr) गंगापूरम सोसायटीतील (Gangapuram Society) चार रहिवाशांना भटक्या कुत्र्याने चावा (street dog bite) घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आता भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी संतप्त रहिवाशांनी पुणे महानगरपालिकेकडे (PMC) केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विमाननगर मधील नव्या विमानतळ रस्त्याजवळ गंगापूरम सोसायटीत सोमवारी (दि. 27 मार्च 2023) दिवसभरात चार नागरिकांना कुत्र्याने चावा घेतला. या सोसायटीतील काही रहिवासी भटक्या कुत्र्यांना खायला देतात. त्यामुळे येथील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे, असा दावाही काही रहिवाशांनी केला. तसेच यावेळी काही श्वानप्रेमी आणि संतप्त रहिवाशी यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली.
घडलेल्या घटनेबद्दल माहिती देताना येथील रहिवासी दशरथ गद्रे (Dashrath Gadre) म्हणाले,”या सोसायटी परिसरात दहा ते पंधरा कुत्री कायम नागरिकांवर धावून जातात. मागील दोन महिन्यात सुमारे 14 लोकांना कुत्रे चावले.” त्यामुळे सोमवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास संतप्त रहिवासी सोसायटीत जमले. त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या श्वान पथकाशी संपर्क साधून माहिती दिली आणि भटक्या श्वानांवर कारवाईची मागणी केली.
हेही वाचा - Pune News: कोणीतरी यांना आवरा हो; तब्बल साडेसोळा हजार पुणेकरांना कुत्र्यांचा चावा
येथील रहिवासी ग्रेसी कॉद्रास (Gracie Coudras) म्हणाल्या,”अशा आक्रमक आणि चावक्या कुत्र्यांवर पुणे महानगरपालिकेने योग्य ती कारवाई करावी. मागील दोन महिन्यात सुमारे 14 घटना घडल्या आहेत. कुत्र्याने हल्ला केलेले लहान मुलं आणि महिला आहेत.”
येथील रहिवासी अनुपमा शर्मा (Anupama Sharma) म्हणाल्या,”काही कुत्री हे अचानक मागून येऊन हल्ला करतात. त्यामुळे मुलं आणि महिला खूप घाबरतात. कुत्रा चावण्याच्या भीतीमुळे लहान मुलांचे खाली येऊन खेळणे बंद झाले आहे.”
हेही वाचा - खाल्ले फटके; लहान मुलांवर हल्ला करणारी कुत्री पकडणाऱ्यांचे प्राणी प्रेमी करत होते लाईव्ह
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84