Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 28 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): गडकिल्ल्यांवर होणाऱ्या अपघातामुळे (Accidents on Forts) जखमी व्यक्तीला सुरक्षितपणे गडावरुन खाली आणता यावे यासाठी अत्याधुनिक फोल्डेबल स्ट्रेचरची (Foldable Stretcher) व्यवस्था पुणे जिल्ह्यातील गड किल्ल्यांवर करण्यात आली आहे. श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठाणच्या (Shreemant Ghorpade Sarkar Pratishthan) माध्यमातून रोटरी क्लब सिंहगड रोडच्या (Rotary Club Sinhgad Road) वतीने ही स्ट्रेचर देण्यात आली आहेत. त्यामुळे गड किल्ल्यांवर होणाऱ्या अपघातातून वेळेवर मदत न पोचण्याची अडचण दूर होणार आहे.
सदर फोल्डेबल स्ट्रेचर्सचा लोकार्पण सोहळा शनिवार दि. 18 मार्च 2023 रोजी करण्यात आला. याअगोदर देखील 5 स्ट्रेचर्स रोटरी क्लब सिंहगड रोड यांच्याकडून रायरेश्वर (Raireshwar), केंजळगड (Kenjalgad), राजगड (Rajgad), तोरणा (Torna), शिवनेरी (Shivneri) या महत्त्वाच्या गडांवर अर्पण करण्यात आले होते. मात्र हॅास्पिटलमध्ये पेशंटला स्ट्रेचर घेऊन जाणे आणि गडावरुन खाली घेऊन येणे या दोन्ही बाबींमध्ये खूप फरक असल्याचे लक्षात आल्याने, आता अत्याधुनिक स्ट्रेचर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
यामध्ये स्ट्रेचरची लांबी आणि वजन या महत्त्वाच्या समस्या होत्या. त्यामध्ये गडप्रेमी डॅा. मनोजराजे गायकवाड (Dr. Manojraje Gaikwad), सचिन देशमुख (Sachin Deshmukh) यांच्या मार्गदर्शनातून ही अत्याधुनिक स्ट्रेचर देण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये अनेक वैशिष्ठ्ये असून, वजनाने हलके परंतु मजबूत मटेरियल. रायरेश्वर मंदिर व शिडी यांच्यामधील अंतर लक्षात घेऊन स्ट्रेचरला व्हील लावले आहेत. त्यामुळे आरामात फक्त एक व्यक्ती सहजपणे पेशंटला मंदिरापासून शिडीपर्यत घेऊन जाईल. स्ट्रेचरचा कलर भगवा घेतला त्यामुळे रक्त लागले तरी ते खराब दिसणार नाही.
हेही वाचा - Pune News: हर्णे बंदर येथील सुवर्णदुर्गावर असलेल्या या तोफांचे तरुणांनी केले काय?
तसेच हे स्ट्रेचर फोल्डेबल असल्यामुळे एका जागेवरून दुसरीकडे सहज नेण्यासाठी मदत होईल. स्ट्रेचरला सुरक्षित ठेवण्यासाठी एक बॅग, जी आपण पाठीला स्कूल बँग प्रमाणे नेऊ शकतो. पेशंट हालू नये यासाठी स्ट्रेचरला पट्टे लावण्यात आलेले आहेत, जे आपण हवे तसे कमीजास्त प्रमाणात आवळू शकतो. स्ट्रेचरवर टाकण्यासाठी एक शीट ज्यामुळे स्ट्रेचरला रक्त लागून खराब होणार नाहीत, अशाप्रकारचे हे स्ट्रेचर असणार आहेत.
सदरील स्ट्रेचर्स रायरेश्वर, राजगड, रोहिडा (Rohida), शिवनेरी, सुधागड (Sudhagad) व रेसेकुटिम भोर (Resekutim Bhor) येथील उपस्थित प्रतिनिधी यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. पुढील दोन आठवड्यांत ठरलेल्या गडांवर ती पोचवली जातील. त्यांचा प्रायोगिक तत्त्वावर पुढील वर्षभरासाठी वापर सुरू केला जाईल. यात अजून काही दोष समोर आले तर ते सुधारून पुढील वर्षी सर्व गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या गावातील पोलीसपाटील यांच्याकडे सोपविण्यात येतील.
त्या आधी गड घेऱ्यातील ज्या गावात स्ट्रेचर देण्यात येणार आहे. तेथील पाच तरुण व तरुणींना प्राथमिक उपचार कसे द्यायचे, याचे प्रशिक्षण डॉक्टर व गडप्रेमी डॅा. मनोजराजे गायकवाड व टीम पुणे येथे एकत्रित मेळावा आयोजित करुन एकदिवसीय प्रशिक्षण देणार आहेत. या कार्यक्रमाला रोटरी क्लब सिंहगड रोडचे अध्यक्ष सतीश खाडे (Rotary Club Sinhagad Road President Satish Khade), रमाकांत जाधव (Ramakant Jadhav), डॉ. मनोज देशपांडे (Dr. Manoj Deshpande), डॉ. अपर्णा देशपांडे (Dr. Aparna Deshpande), स्वाती जाधव (Swati Jadhav), शरद लागू (Shard Lagu), सुहास कुलकर्णी (Suhas Kulkarni) यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
त्याचबरोबर डॉ. अश्विनी घोरपडे गजेंद्रगडकर, वरिष्ठ समाजशास्त्रज्ञ बायफ एनजीओ अनुराधा घोरपडे (Senior Sociologist BAIF NGO Anuradha Ghorpade), दिपक दत्तात्रय घोरपडे, प्रशांत थोरात, महेन्द्र देवघरे, विशाल सुरेश जाधव, सुनिल जंगम, दर्शनजी वाघ आदि मान्यवर उपस्थित होते.
यांच्यावर गडावर स्ट्रेचर पोचवण्याची जबाबदारी
राजगड - कुणाल भोसले (Kunal Bhosale)
रोहिडा - दर्शनजी वाघ (Darshan Wagh)
शिवनेरी - दर्शनजी वाघ
रायरेश्वर - शंकर जंगम (Shankar Jangham)
सुधागड - संजयजी करपे (Sanjay Karpe)
रेसेकुटिम भोर - सचिन देशमुख
हेही वाचा - स्वराज्याचे शिलेदार यांना सिंहगडावर सापडला 3740 प्लास्टीक व 42 दारूच्या बाटल्यांचा खजिना
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes