Type Here to Get Search Results !

Sunil Mane: शहराच्या मध्यवर्ती भागात संविधान शिल्प उभे करावे; सुनील माने यांची आयुक्तांकडे मागणी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 3 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): देशातील नागरिकांना एकता आणि अखंडता प्राप्त करून देणाऱ्या संविधानाची प्रतिकृती पुणे शहरातील मध्यवर्ती भागात उभी करावी, अशी मागणी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने (BJP Pune City Secretary Sunil Mane) यांनी पुणे महानगरपालिकेकडे केली. याबाबतचे पत्र त्यांनी आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) तसेच मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे (Chief Engineer Prashant Waghmare) यांना दिले. यावेळी त्यांच्या सोबत सुनील दैठणकर (Sunil Daithankar), जितेंद्र गायकवाड (Jitendra Gaikwad), अनिल माने (Anil Mane) आदी उपस्थित होते. (pune news)

हेही वाचा - कोरोना मृतांच्या नातेवाईकांना सहाय्य देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा; सुनील माने यांची पालकमंत्र्याकडे मागणी

“लोकशाही, मूलभूत मानवी अधिकार, सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारा मौलिक दस्तावेज म्हणजे आपली भारतीय राज्यघटना आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान देशाला बहाल केले आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान देशाला लागू झाले. भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना हक्क आणि अधिकार बहाल केले आहेत. संविधानामुळे देशाची एकता आणि अखंडता टिकून आहे. देशाचा राज्यकारभार तसेच प्रशासकीय कारभार संविधानानुसार चालतो त्यामुळे संविधानाला देशाचे राष्ट्रग्रंथ म्हंटले जाते. यामुळे संविधानाला अनन्य साधारण महत्व आहे.

भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधानापैकी एक आहे. सध्या देशभरात संविधान ही एक चळवळ बनली आहे. त्यामुळे संविधानाबद्दल जनजागृती व्हावी, त्याचे महत्व प्रत्येक भारतीयाला कळावे या उद्देशाने भाजपा सत्तेत असताना नागपूर महानगरपालिकेमार्फत संविधान चौक येथे संविधान उद्देशिका शिल्प उभा करण्यात आले. याच धर्तीवर पुणे महानगरपालिकेमार्फत शहराच्या मध्यवर्ती भागात संविधान शिल्प उभारण्यात यावे.” अशी मागणी सुनील माने यांनी या पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे. 

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा - मागास विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्तीत वाढ करण्याचे मुख्यमंत्र्याचे आश्वासन; सुनील माने यांची मागणी

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n     

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.