Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 20 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): कात्रज (katraj) चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (National Highway Authority) माध्यमातून उड्डाणपुलाचे (flyover) काम सुरु आहे. या कामाची पाहणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांसह (Traffic Police Officers) केली.
या पाहणी दौर्यादरम्यान कात्रज-कोंढवा रस्त्याला हा पूल जिथे उतरतो त्या ठिकाणी परिसरतील नागरिकांना भेडसावणारी वाहतुक समस्या व त्यावर उपाय, तसेच कामाच्यावेळी कात्रज चौक येथे निर्माण होणार्या वाहतूक कोंडी संदर्भातही माजी नगरसेवक प्रकाश कदम, युवराज बेलदरे, प्रतीक कदम यांनी उपाय सुचविले. तसेच या निमित्ताने सेवा रस्ते, कामात येणार्या इतर अडचणी व काम पूर्णत्वास जाण्यासाठी लागणारा वेळ याविषयी सविस्तर चर्चा करून अधिकार्यांना योग्य त्या सुचना करण्यात आल्या.
भेडसावणाऱ्या समस्यांवर तत्काळ उपाययोजना करत कात्रज चौक ते नवले पूलादरम्यान (Katraj To Navale Bridge) असणार्या वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन सदर काम लवकरात लवकर पूर्ण करावे. त्याचबरोबर, यावेळी नवलेपूल ते कात्रज चौक रस्त्यावरील भुयारी मार्गाबाबतही आढावा घेऊन कामाला गती देण्याच्या सूचना सुळे यांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिल्या.
यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता महेश पाटील (Mahesh Patil, Deputy Engineer, National Highways), शाखा अभियंता सलीम शेख (Branch Engineer Salim Shaikh), वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सागर पवार (Sagar Pawar, Police Sub-Inspector of Traffic Department) यांच्यासह माजी नगरसेवक प्रकाश कदम (Ex-Corporator Prakash Kadam), काका चव्हाण (Kaka Chavhan), युवराज बेलदरे (Yuvraj Beldare), सचिन दोडके (Sachin Dodke) उपस्थित होते.
याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता सलीम शेख म्हणाले कि,“खासदार सुप्रिया सुळे यांनी महामार्गाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर नवलेपूल ते कात्रज चौक रस्त्यावरील भुयारी मार्गाचे काम डिझाईन तयार करुन लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच, कात्रज चौकातील उड्डाणपुलाचेही काम वेळेत पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे.”
हेही वाचा - भरधाव रुग्णवाहिकेने पादचाऱ्याला उडवले; नवले पुलाजवळील घटनेत पादचारी ठार
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84