Type Here to Get Search Results !

MP Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे ऑनलाईन सेलिब्रेशन; सुळे भेटीगाठीत व्यस्त

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 7 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे (Member of Parliment Supriya Sule Marriage Anniversary) औचित्य साधून वडकी (Vadki) ग्रामस्थांच्या वतीने केक कापून लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांचे पती सदानंद सुळे (Sadanand Sule) केक कापण्याच्या सोहळ्यात व्हिडीओ कॉलच्या (Video Call) माध्यमातून लाईव्ह सहभागी झाले होते. (MP Supriya Sule Online marriage Anniversary Celebration)

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांचा दिनक्रम व्यस्त आहे. अशातच शनिवार दिनांक 4 मार्च 2023 रोजी लग्नाच्या वाढदिवशीच खासदार सुप्रिया सुळे यांचा गोदरेज सोसायटी उंड्री (Godrej Greens Undri) येथील नागरिकांशी संवाद, हांडेवाडी पक्ष कार्यालय (NCP Party Office Handewadi) येथे महिला दिन कार्यक्रम (Womens Day) आणि आदर्श माता पुरस्कार (Ideal Mother Award), रेशनिंग (Ration) दुकानदार बैठक, कचरा डेपो (Dumping Ground Uruli) पाहणी, भैरवनाथ मंदिर उरुळी देवाची (Bhairavnath Temple Uruli) येथे भेट, महादेव मंदिर वडकी (Shiv Mandir Vadki) येथे देखील ग्रामस्थ भेट, असा हवेली दौरा ठरलेला होता.

हेही वाचा - ओडिशामध्ये आंदोलकांनी थांबवलेली हावडा एक्स्प्रेस खा. सुळेंच्या मध्यस्तीनंतर सुखरूप रवाना

या पार्श्वभूमीवर खासदार सुळे या आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन न करता, जनसामान्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी वेळ देत असल्याने, वडकी ग्रामस्थांच्या वतीने केक कापून लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांचे पती सदानंद सुळे व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून लाईव्ह सहभागी झाले होते. केक कापल्यावर वडकी गावातील सर्व महिलांनी सुळे यांना साडी देखील भेट दिली.

यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थांचे आभार मानत असताना,”देशात प्रचंड महागाई वाढली बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला संसदेत यावर वारंवार आवाज उठवूनही सरकार दुर्लक्ष करत आहे. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका रखडल्याने विकास कामांवर मोठा परिणाम होत असून, राज्य सरकार विरोधकांच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालले आहे?” असा सवाल संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

हेही वाचा - बारामती-मुंबई थेट रेल्वेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे खात्याला दिला पर्याय

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Loksabha Matdarsangha) संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी वडकी गाव येथील श्री देव शंभू महादेव देवस्थान ट्रस्टच्या (Shri Dev Shambhu Mahadev Devasthan Trust) मंदिराच्या कामाची पाहणी करण्यासाठी वडकी गाव येथे भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मंदिराच्या कामासाठी खासदार आणि आमदार निधीतून (MP Fund | MLA Fund) निधी देण्याबाबत सुळे यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले.

देवस्थान कमिटीचे अध्यक्ष पंडित मोडक, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्याचे अध्यक्ष भारती शेवाळे, माजी सभापती सचिन घुले, हवेली तालुकाध्यक्ष भरत झांबरे, माजी जिल्हाधिकारी संभाजी झेंडे, विश्वस्त बाळासाहेब बाबुराव साबळे, विश्वस्त रविंद्र पवार, संदीप भैरू मोडक, रामदास आंबेकर, आबा मोडक, अभिजित विलास मोडक, माजी सरपंच सुनील गायकवाड, उत्तम गायकवाड, सचिन मोडक, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र गायकवाड, श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष रमेश मोडक, सचिव संतोष गायकवाड, खजिनदार सगाजी केरबा मोडक, पंकज मोडक, हवेली शिवसेना अध्यक्ष संदीप धाडसी मोडक, तात्या भाडळे, नेहा मोडक, अविनाश मोडक, वर्षा गायकवाड, वैशाली मोडक, शैला रंगनाथ मोडक, आरती हिरामण गायकवाड, कल्पना संजय पवार, संगीता मोहन मोडक, पोलीस पाटील स्वाती नितीन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अशोक जग्गनाथ मोडक, आदीसह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

हेही वाचा - कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी संबंधीत संस्थांची बैठक घेऊन तोडगा काढा: सुप्रिया सुळे

वडकी गावाच्या सहकार्यातून श्री शंभू महादेव देवस्थान मंदिराचे नूतनीकरणाचे काम सुरू असून, यासाठी अंदाजे 4 कोटी रुपये खर्च येणार आहे. गावकऱ्यांनी आत्तापर्यंत 80 लाख रुपये जमा केले आहेत. तर खासदारांनी देखील मंदिरासाठी निधी द्यावा, अशी मागणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पंडित मोडक, उपाध्यक्ष बाळासाहेब साबळे, विश्वस्त रविंद्र पवार यांनी केली.

Shri Dev Shambhu Mahadev Devasthan Trust Committee President Pandit Modak, NCP District President Bharti Shewale, Former Speaker Sachin Ghule, Haveli Taluka President Bharat Zambare, Former Collector Sambhaji Zende, Trustee Balasaheb Baburao Sable, Trustee Ravindra Pawar, Sandeep Bhairu Modak, Ramdas Ambekar, Aba Modak, Abhijit Vilas Modak, Ex-Sarpanch Sunil Gaikwad, Uttam Gaikwad, Sachin Modak, Gram Panchayat Member Machindra Gaikwad, Shri Shambhu Mahadev Devasthan Trust Vice President Ramesh Modak, Secretary Santosh Gaikwad, Treasurer Sagaji Kerba Modak, Pankaj Modak, Haveli Shiv Sena President Sandeep Dhadsi Modak , Tatya Bhadale, Neha Modak, Avinash Modak, Varsha Gaikwad, Vaishali Modak, Shaila Ranganath Modak, Aarti Hiraman Gaikwad, Kalpana Sanjay Pawar, Sangeeta Mohan Modak, Police Patil Swati Nitin Gaikwad, Social Activists Ashok Jagganath Modak, etc. were present in large numbers on this occasion.


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes           

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/           

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times          

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes           

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes         

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n           

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes        

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.