Type Here to Get Search Results !

Pune News: हर्णे बंदर येथील सुवर्णदुर्गावर असलेल्या या तोफांचे तरुणांनी केले काय?

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

suvarna durg fort conservation - checkmate times

पुणे, दि. 24 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून नागरिक दापोली (Dapoli) आणि विशेषतः हर्णे समुद्र किनाऱ्यावर (Harne Bandar) पर्यटनासाठी (Konkan Tour) येतात. त्यातील शिवप्रेमी सुवर्णदुर्ग (Suwarna Durga) या जलदुर्गाला (Sea Fort) भेट देतात. मात्र त्याची सध्याची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. ही समस्या ओळखून गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्यच्या कोकण विभागातील (Gad Kille Sanvardhan Sanstha Maharashtra Kokan Region) मावळ्यांनी सुवर्णदुर्ग संवर्धन (Fort Conservation) मोहीम राबवली.

शिवकाळात जसे गिरी दुर्गाना महत्व होते, तसेच जलदुर्गाना पण अनन्य साधारण महत्व होते. "ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र" असे आपले छत्रपती (Chhatrapati Shivaji Maharaj Forts in Konkan) आपल्या मावळ्यांना बोलत असत, या भावनेतून छत्रपतींनी बर्‍याच जलदुर्गाची बांधणी केली. काही किल्यांची डागडूजी केली. पण आता जसे जसे दिवस बदलत गेले, तस तसे हे गड किल्ले दुर्लक्षीत (Ignored Forts) व्हायला लागले. दुर्गाची पडझड झाली काही गड किल्ले, जलदुर्गावरील वास्तू पडून गेल्या. हे असेच चालू राहिले तर आपला छत्रपती शिवरायांचा इतिहास (History of Shivaji Maharaj) काळाच्या ओघात नष्ठ होणार म्हणून या वास्तूचे जतन, संवर्धन व संरक्षण (Preservation, conservation and protection of forts) होणे गरजेचे आहे.

यासाठी गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यावर स्वच्छता मोहिमा राबत असते. त्यातील एक मोहीम या रविवारी दि. 19 मार्च 2023 ला “किल्ले सुवर्णदुर्ग” (Suvarnadurga fort) या जलदुर्गावर संस्थेच्या युवक युवतींनी स्वच्छता मोहीम राबवली. या वेळी गडाच्या तटबंदीवरती वाढलेली झुडपं व छोट्या झाडांच्या मुळ्या काढण्यात आल्या. बुरुजांवर वाढलेले गवत काढण्यात आले. सुवर्ण दुर्गावर संस्थेच्या वतीने हि मोहिम दुसऱ्यांदा राबवण्यात आली आहे.

suvarnadurg

या मोहिमेत गड किल्ले संवर्धन संस्थेच्या मावळ्यांनी किल्ल्या बाहेर अस्थाव्यस्थ अवस्थेत पडलेल्या 2 तोफापैकी (Cannons on Suvarnadurga) पहिल्या मोहिमेत 1 तोफ आणि आताच्या मोहिमेत 1 तोफ अशा दोन्ही तोफा गडाच्या आत नेऊन सुरक्षित जागी ठेवण्यात आल्या. त्याचबरोबर त्या तोफांची स्वच्छता (Cleaning of Cannon) करून, त्यांचे पूजन देखील करण्यात आले. यामुळे एक वेगळीच उर्जा मिळाल्याचे या दुर्गसेवक मावळ्यांनी सांगितले. या मोहिमेत ऐकून 20 मुलं मुली सहभागी झाले होते.

suvarna durg

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes            

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes            

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.