Type Here to Get Search Results !

Supriya Sule: 'आमाला आज पहिल्यांदा माणसात आल्यासारखं वाटलंय'; खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर आदिवासी महिलेचा कंठ फुटला

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

 

पुणे, दि. 10 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय घोडेगाव (Integrated Tribal Project Regional Office, Ghodegaon) व उपविभागीय अधिकारी हवेली (Sub Divisional Officer Haveli) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबवून वर्षानुवर्षे शासकीय सुविधांपासून वंचित असलेल्या पश्चिम हवेलीतील आदिवासी कातकरी नागरिकांना (Tribal Katkari citizens of Paschim Haveli) आधार कार्ड (Adhar Card), रेशनकार्ड (Ration Card) काढून देण्यात आले आहे. हा कार्यक्रम खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. नियोजनाप्रमाणे कार्यक्रम सुरू असताना अचानक एका ज्येष्ठ आदिवासी कातकरी महिलेच्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (Pune News)

जागतिक महिला दिनानिमित्त (International Womens Day) माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे (Former Zilla Parishad Member Navnath Parge) व पुणे जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे (Pooja Parge, former Chairperson of Pune Zilla Parishad Women and Child Welfare) यांच्या माध्यमातून गोऱ्हे बुद्रुक (Gorhe Budruk) येथे संबंधित लाभार्थ्यांना आधार कार्ड व रेशनकार्ड वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या आदिवासी विकास विभागातील रेणूका जाधव या उपस्थित मान्यवरांना भाषणासाठी निमंत्रित करत होत्या व त्याप्रमाणे भाषणे होत होती. अचानक अनुसया नामदेव जाधव (Anusaya Namdev Jadhav) ही साठ ते पासष्ट वर्षांची ज्येष्ठ कातकरी महिला उठली आणि सभागृहातील गर्दीतून थेट स्टेजवर गेली.

स्टेजवरील मान्यवर व समोर बसलेले कातकरी बांधव अनुसया जाधव यांच्याकडे पाहत होते. अनुसया जाधव यांनी माइक कडे हात केला आणि 'मला बोलायची' म्हटल्या ! “आमाला आज पहिल्यांदा माणसात आल्यासारखं वाटलंय' हे पहिलं वाक्य अनुसया जाधव बोलल्या आणि संपूर्ण सभागृह स्तब्ध झालं. "आमाला सगळे कागदं मिळाली पायजे, राह्यला जागा पायजे, जागा मिळाली तर घरं होत्यान. आमाला बी लेकरांना शिकवावा वाटतं. वढ्याखोड्यानी फिरणारी लेकरं साळत जातील. सरकारनी आमची कायतरी सोय कराया पायजे.” असं बोलत अनुसयाबाईंनी सर्वांची मनं जिंकली.

अनुसया जाधव यांचं पूर्ण बोलून झाल्यानंतर सर्वांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केले कारण सर्व कातकरी समाजाच्या मनातील भावना त्या बोलल्या होत्या. खासदार सुप्रिया सुळे या बोलायला उभ्या राहिल्यानंतर अनुसया जाधव यांच्या बोलण्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला व कातकरी नागरिकांना निवाऱ्यासाठी हक्काची जागा मिळावी यासाठी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा शब्द दिला. तसेच पुरवठा विभागातील परिमंडळ अधिकारी गजानन देशमुख (Gajanan Deshmukh, Supply Department Officer) हे या आदिवासी कुटुंबांना रेशनकार्ड देण्यासाठी तत्परतेने सहकार्य करत असल्याबद्दल सुळे यांनी त्यांचेही कौतुक केले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                   

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                 

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                 

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                 

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes               

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes              

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.