Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 17 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): राजस्थान (Rajasthan) येथून पुण्यात एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरूणाचे अपहरण (kidnapped) करून त्याला पिस्तुलाचा धाक दाखवत त्याच्याकडील रोकड आणि मोबाईल लुटमार (Robbed) करणार्या दोन दरोडेखोरांना दंड सुनावला गेला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव (Additional Sessions Judge P. P. Jadhav) यांनी हा दंड सुनावला. (Pune Crime news)
याबाबत चंदन राजकुमार शर्मा (Chandan Rajkumar Varma) (वय - 28, रा. शिवनेरी हॉस्टेल सिंहगड कॉलेज, आंबेगाव बुद्रुक मुळ रा. राजस्थान) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Police Station) फिर्याद दिली होती.
हेही वाचा - अपघाताचा बहाणा करून लुटणाऱ्या त्रिकुटाला दत्तवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7 वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 46 हजारांचा दंड सुनावला आहे. दोघांना 15 दिवसात सुनावलेली ही दुसरी शिक्षा आहे. यापूर्वी त्यांना मोक्काच्या गुन्ह्यात विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. ललित दिपक खोल्लम (Lalit Deepak Khollam) (36) आणि मयुर दिलीप राऊत (वय - 29, दोघेही रा. मु. पो. गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील एकनाथ तरलगट्टी (Additional Public Prosecutor Eknath Taralgatti) यांनी काम पाहिले. (Pune Crime news)
मिळालेल्या माहितीनुसार, शर्मा राजस्थान येथील झुनझुनु (Jhunjhunu) येथून पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये (Sinhagad College, pune) एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी आला होता. 13 ऑगस्ट 2015 रोजी तो त्याच्या वाकड (waked) येथील मित्राकडे जाऊन रात्री बसने बालेवाडी स्टेडियम (Balewadi Stadium) जवळ मुंबई-बेंगलोर महामार्गावर (Mumbai-Banglore Highway) उतरला. यावेळी सहासिटर रिक्षात बसून पुन्हा तो मुंबई-बेंगलोर महामार्गावरील पी. के. बिर्याणी हाऊस समोर रात्री आठ वाजता उतरला. तेव्हा एक जण कारमध्ये आला आणि त्याने त्याला कुठे जायचे आहे अशी विचारणा करून त्याला गाडीत बसण्यास सांगितले.
हेही वाचा - सोशल मीडियावर मुलीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून लुटणाऱ्या खान बंधूंना अटक
यावेळी गाडीत आणखी एकजण अदोगरच बसला होता. यावेळी त्यांनी गाडी सिंहगड कॉलेजकडे न नेता खेडशिवापूरच्या (Khed-shivapur) दिशेने नेली. त्याला शंका आल्याने त्याने याबाबत विचारणा केली असता त्यांनी गाडी थांबवत पिस्तुल त्याच्या डोक्याला लावून त्याच्याकडील 50 हजार आणि मोबाईल काढून घेतले. (Pune Crime news)
याप्रकरणी अॅड. तरलगट्टी यांनी दोन्ही आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. खटल्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेस संखे (Senior PI Shailes Sankhe), गुन्हे निरीक्षक जयंत राजुरकर (Crime Inspector Jayant Rajurkar) यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव (Sub Inspector of Police Sanjay Jadhav), पोलीस हवालदार पुणेकर, जाधव, गाढवे यांनी महत्वाची कामगिरी बजावली.
हेही वाचा - दूधवाला बनून पहाटेच्या चोऱ्या करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84