Type Here to Get Search Results !

मुदत संपल्यानंतर देखील रस्त्यांची खोदाई; पावणे दोन कोटी रुपयांचा ठोठावला दंड

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 4 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): महापालिकेने (PMC) दिलेल्या परवानगीची मुदत संपल्यानंतर आणि अटी, शर्तींचा भंग करून अनधिकृतरीत्या विमानतळ रस्त्यावर खोदाई केली जात होती. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने संबंधित व्यावसायिकाला एक कोटी 83 लाख 30 हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती पथ विभागाचे शाखा अभियंता दत्तायत्र तांबारे (Dattayatra Tambare, Branch Engineer, Road Department) यांनी दिली.

महापालिका आयुक्तांनी गेल्या 30 मे नंतर खोदाई करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले होते. तरी देखील गेल्या 5 व 6 जून 2022 रोजी विमाननगर (Vimannagar) परिसरातील साकोरेनगर (Sakorenagar) ते विमानतळ व्हीआयपी रस्त्यावर (Airport Road) महावितरणची केबल टाकण्यासाठी खोदाई केली होती. यामुळे रस्त्यावरील पदपथांची दुरवस्था झाली आहे.

एका वेळी पन्नास मीटर खोदाई करणे, काम सुरू असताना वाहतुकीस अडथळा होणार नाही याबाबतची दक्षता घेणे, खोदाईच्या भोवती नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे, खोदाईचे काम दिवसा करावे, वाहतूक विभागाची परवानगी घेणे, आदी नियमांचे रस्ता खोदाई करताना पालन करावे लागते. तसेच खोदाई करताना महापालिकेसाठी दोन डक्ट टाकणे देखील बंधनकारक आहे. खोदाईमुळे रस्त्यावर आलेला माती-राडारोडा उचलावा लागतो, अशा विविध अटी, शर्तींवर महापालिकेने रस्ता खोदाईसाठी पवानगी दिली होती.

तरी देखील संबंधित व्यावसायिकांने हे काम करताना ‘वर्क ऑर्डर’मधील काही अटींचे उल्लघंन केले होते. तसेच, अनधिकृत रस्ता खोदाई करणार्‍यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वडगाव शेरी नागरिक मंचाचे आशिष माने (Ashish Mane of Vadgaon Sheri Nagarik Mancha) यांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने या तक्रारीची चौकशी केली होती. यात ‘वर्क ऑर्डर’ची मुदत संपल्यानंतर खोदाई केल्याचे समोर आले आहे. तसेच, महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतरीत्या 2,600 मीटर खोदाई केल्याचे समोर आले आहे. यामुळे संबंधित व्यावसायिकांला तीन पट म्हणजेच एक कोटी 83 लाख 30 हजारांचा दंड केला असल्याचे तांबारे यांनी सांगितले.

हेही वाचा - काळ्या यादीतील ठेकेदार भरतायत टेंडर? त्यांच्यावरील कारवाईचे काय झाले?

“संबंधित व्यावसायिकाला दंडाची रक्कम त्वरित भरण्यास सांगितले आहे. दंडाची रक्कम भरली जात नाही, तोपर्यंत बांधकाम विभागाने या व्यावसायिकाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, असे पत्र देण्यात येणार आहे.” असे महापालिका पथ विभागाचे शाखा अभियंता दत्तायत्र तांबारे म्हणाले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com          

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes           

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes         

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/         

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes         

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes       

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n         

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.