Type Here to Get Search Results !

Pune Crime News: वाघोलीत लॉजवर बंगाली मुलींकडून वेश्याव्यवसाय; पोलिसांनी केला पर्दाफाश

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 3 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): गुन्हे शाखेच्या (Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाच्या (Social Security Cell) पथकाने लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा (Prostitution) पर्दाफाश करत चार पीडित तरुणींची सुटका केली. त्यामध्ये पश्चिम बंगाल (west bangal) आणि बांग्लादेश (Bangladesh) तरुणींचा सहभाग आहे.

वाघोली (Wagholi) येथील उबाळेनगरमधील (Ubalenagar) जय भवानी लॉजिंग ॲण्ड बोर्डिंग (Jay Bhawani Lodging and Boarding) येथे हा प्रकार सुरू होता. लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) लिंबाजी सखाराम वाघमारे (Limbaji Sakharam Waghmare) (वय 29), प्रवीण शेखर पुजारी (Pravin Shekhar Pujari) (रा. आळंदी फाटा लोणीकंद) या दोघांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार (The Immoral Traffic (Prevention) Act, 1956) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील लिंबाजी वाघमारे याला अटकदेखील (Arrest) करण्यात आली आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला वाघोली येथील उबाळेनगरमधील जय भवानी लॉज ॲण्ड बोर्डिंग येथे वेश्याव्यवासाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. माहितीनुसार, पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर छापा (Raid) टाकून चार तरुणींनींची तेथून सुटका केली. ताब्यात घेतलेल्या चार तरुणींची हडपसर येथील रेस्क्यू फाउंडेशनमध्ये (Rescue Foundation, Hadapsar) रवानगी करण्यात आली आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav), सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (Assistant Police Inspector Ashwini Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी राजेंद्र कुमावत (Rajendra Kumawat, मनीषा पुकाळे (Manisha Pukale), तुषार भिवरकर (Tushar Bhivarkar), इरफान पठाण (Irfan Pathan), अमित जमदाडे (Amit Jamdade) यांच्या पथकाने केली.

हेही वाचा - 'या' स्पा मध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n     

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.