Type Here to Get Search Results !

MSEDCL News | वारजे माळवाडी मधील विस्कळीत वीज पुरवठ्यावर महावितरणचा पालिका प्रशासन आणि ठेकेदाराला शॉक

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

warje malwadi power supply interruption - checkmate times

पुणे, दि. 16 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील स्व सोनेरी आमदार रमेश वांजळे चौकातून (MLA Ramesh Wanjale Chowk) वारजे गावात जाणाऱ्या रस्त्यावर सुरु असलेल्या पावसाळी वाहिनीच्या (Drainage Line) खोदकामासह परिसरात वारंवार भूमिगत वीजवाहिन्या (Underground Power Lines) तुटत आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांबरोबर महावितरणचे (MSEDCL) नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन (PMC) आणि ठेकेदाराकडून (Contractor) असहकार्य होत असल्याचे लक्षात आल्याने, महावितरणने चांगलाच शॉक दिल्याचे समोर आले आहे.

महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीच्या खोदकामात महावितरणच्या उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्या (High Pressure Underground Power Lines) वारंवार तोडल्या जात असल्याने गेल्या 8 ते 10 दिवसांपासून वारजे परिसरातील विविध भागात खंडित वीजपुरवठ्याचा (Power Intermittent) ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महावितरणचेही आर्थिक नुकसान (Financial Loss of MSEDCL) झाले आहे.

हेही वाचा - मुदत संपल्यानंतर देखील रस्त्यांची खोदाई; पावणे दोन कोटी रुपयांचा ठोठावला दंड

सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी टाकण्यासाठी महानगरपालिकेच्या कंत्राटदाराकडून जेसीबीद्वारे (JCB) वारजे परिसरात खोदकाम सुरू आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराने महावितरणच्या स्थानिक कार्यालयांना (Local Office of Mahavitaran) कोणतीही पूर्वकल्पना न देता खोदकाम सुरू केले. यामध्ये 1 ते 8 मार्च 2023 दरम्यान वारजे पूल (Warje Bridge), खानवस्ती (Khan Vasti), वारजे वाहतूक पोलीस चौकी (Warje Traffic Branch), रामनगर (Ramnagar) तसेच वारजे पाणीपुरवठा (Warje Water Treatment Plant) याठिकाणी 22 केव्हीच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडल्या गेल्या होत्या.

हेही वाचा - वीज नियामक आयोगाच्या सुनवाईला आम आदमी पार्टी वगळता इतर राजकीय पक्षांची गैरहजेरी

त्यामुळे पुणे मेट्रो (Pune Metro), डहाणूकर कॉलनी (Dahanukar Colony), प्रथमेश सोसायटी (Prathamesh Society), भुजबळ टाऊनशिप (Bhujbal Township), डुक्करखिंड परिसर (Dukkar Khind), खानवस्ती (Khan Vasti), हिंदुस्थान बेकरी (hindusthan Bakery), रामनगर परिसरातील काही भागात 3 ते 4 हजार वीजग्राहकांना सरासरी एक ते दोन तासांपर्यंत खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. तर उर्वरित ठिकाणी महावितरणकडून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुवरठा सुरळीत ठेवण्यात आला होता.

दरम्यान, खोदकामात जेसीबीने भूमिगत वीजवाहिन्या तोडल्यानंतर त्याची जबाबदारी घेण्यास कंत्राटदाराने नकार दिल्यानंतर, महावितरणकडून पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ लेखी स्वरूपात कळविण्यात आले. तसेच वारजे पोलीस स्टेशन (FIR in Warje Police Station) मध्ये फिर्याद देण्यात आली. यानंतर महावितरण आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी खोदकामाच्या ठिकाणी संयुक्त पाहणी केली. यानंतर खोदकामात वीजवाहिन्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्याचे ठरविण्यात आले. तसेच वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च महावितरणला देण्याचा आदेश संबंधित कंत्राटदाराला महापालिकेकडून देण्यात आला आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                          

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                  

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                  

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                 

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                  

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://s harechat.com/profle/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes               

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.