Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 27 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): दिनांक 24 मार्च 2023 रोजी महिला बाल विकास विभाग (Department of Women and Child Development), युनिसेफ (UNICEF), मिरॅकल फाउंडेशन (Miracle Foundation) आणि दीपक फाउंडेशन (Deepak Foundation) यांच्या संयुक्त विद्दमानाने सुरु असलेल्या कार्यक्रमाची आढावा सभा / कार्यशाळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.
एक प्रेमळ कुटुंब प्रत्येक बालकासाठी मिळवून देणाऱ्या या चळवळीत आज अनेक सहभागीदार सामील झाले होते. राज्यात कुटुंब आधारित आणि पर्यायी संगोपनाचा पुरस्कार करण्यासाठी व तो अधिक दर्जेदार व्हावा यासाठी महिला बाल विकास विभाग, युनिसेफ, मिरॅकल फाउंडेशन आणि दीपक फाउंडेशन यांच्या सहकार्याने गेली 4 वर्षे कुटुंब आणि समाज सबलीकरणाचे काम रामनगर वस्ती, वारजे (Ramnagar Vasti, Warje) येथे प्रायोगिक तत्वावर सुरु आहे.
बालकाच्या संगोपनात आणि संरक्षणात कुटुंब आणि समाज यांची भूमिका आणि जबाबदारी खूप महत्वाची आहे. त्याच बरोबर बालकांशी संबंधित प्रश्नाचे, कायद्याचे महत्व कळावे, समाजातील सर्वांना त्याची गरज निर्माण व्हावी व उपलब्ध असलेल्या योजना, सेवा सुविधा, याची माहिती सविस्तर मिळावी जेणे करून कुटुंब आणि समाज अधिक प्रगल्भ होईल या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमास पुणे शहरातील वेगवेगळ्या विभगातील अधिकारी / प्रतिनिधी, सामाजिक स्वयंसेवी संस्था, समुदायातील यंत्रणा यांना आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले, त्यानंतर मिरॅकल फाउंडेशन संस्थेच्या राज्य प्रमुख स्वरांजली थोरात (Swaranjali Thorat, State Head of Miracle Foundation) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यामध्ये त्यांनी कार्यक्रमाचे ध्येय आणि उद्देश सांगितला तर दीपक फाउंडेशन संस्थेचे कार्यक्रम समन्वयक रोहित गाडेकर (Deepak Foundation Program Coordinator Rohit Gadekar) यांनी झालेल्या कार्यक्रमाचा प्रगती आढावा आणि अडचणी याबद्दल सविस्तर सादरीकरण केले.
कार्यक्रमादरम्यान प्रत्येक उपस्थित विभागातील अधिकारी / प्रतिनिधी यांना त्यांच्या विभागाबद्दल व उपलब्ध असलेल्या सेवा सुविधा, योजना याबद्दल माहिती देण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. यामध्ये शिक्षण, पोलीस, एकात्मिक बाल विकास, पोस्ट ऑफिस, चाइल्ड लाईन, आर्क नेटवर्क, होप फॉर चिल्ड्रेन, युथ अम्बेसिडर यांनी आपल्या कामाविषयी आणि उपलब्ध असलेल्या सेवा सुविधा, योजनांबद्दल सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या दुपारच्या सत्रामध्ये चर्चा सत्र आयोजित केले होते, चर्चा सत्रामध्ये बाल अधिकार आणि बाल संरक्षण, कुटुंब आणि समाज सक्षमीकरण, या विषयावर चर्चा झाली. यामध्ये रामनगर वस्ती मध्ये कार्यरत असलेली वस्ती बाल संरक्षण समिती, बाल पंचायत आणि समुदाय स्वयंसेवक यामधील निवडक सदस्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये दिलीप बराटे (माजी उप-महापौर / विरोधी पक्ष नेते / रामनगर वस्ती बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष) (Dilip Barate) यांनी रामनगर वस्तीमध्ये झालेला बदल, बालक आणि पालक यांच्या मध्ये वाढलेला आत्मविश्वास आणि समाजामध्ये बाल अधिकार आणि बाल संरक्षण याबद्दल होत असलेल्या जागृती बद्दल समाधान व्यक्त केले, आणि येणाऱ्या काळामध्ये बाल संरक्षणाचे काम समुदाय यंत्रणा यांच्या सहकार्याने आणखी जोमाने चालू ठेवू असा विश्वास त्यांनी दिला.
हेही वाचा - सातवी च्या विद्यार्थ्यांनी पार पडली STEM शिक्षणावर आधारीत कार्यशाळा: जाणून घ्या नक्की काय प्रकार आहे
या कार्यक्रमास तृप्ती पाटील, पोलीस उप निरीक्षक (बाल स्नेही पोलीस अधिकारी, वारजे माळवाडी पुणे), दिलीप बराटे, नगरसेवक (माजी उप-महापौर / विरोधी पक्ष नेते / रामनगर वस्ती बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष), स्वरांजली थोरात, राज्य प्रमुख, मिरॅकल फाउंडेशन इंडिया संस्था, सौ. अरुणा मॅडम, सुपरवाइजर, शिक्षण मंडळ, पुणे महानगर मालिका, सौ. जयश्री शिंदे, शिक्षिका, रामनगर महानगर पालिका शाळा, सुनील किर्वे, पोस्ट कार्यालय, वारजे, मंजुषा अहिरराव, सुपरवाइजर, एकात्मिक बाल विकास विभाग, रोहिणी शिंदे, चाइल्ड लाईन समन्वयक, सुशांत (आर्क नेटवर्क प्रतिनिधी) विशाल वाघमारे, सचिन (होप फॉर चिल्ड्रेन प्रतिनिधी), अक्षता (युथ अम्बेसिडर), वस्ती बाल संरक्षण समिती सदस्य, बाल पंचायत समिती सदस्य, समुदाय स्वयंमसेवक, पालक, लक्षित कुटुंब सदस्य, मिरॅकल फाउंडेशन आणि दीपक फाउंडेशन संस्थेचे कर्मचारी वर्ग आणि वस्तीमधील सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सागर शितोळे (Sagar Shitole) यांनी केले तर शेवटी आभार रोहित गारोळे (Rohit Garole) यांनी व्यक्त केले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो
करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84