Type Here to Get Search Results !

Pune Crime News | पुणे विमानतळावरील महिला अधिकाऱ्याला तरुणी चावली; टॅक्सीच्या भाड्यावरून झाला वाद

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

woman bites female officer at pune airport - checkmate times

पुणे, दि. 13 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): लोहगाव विमानतळावर (Lohegaon Airport) गोंधळ घालून केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलातील (Central Industrial Security Force) महिला अधिकाऱ्याला (Lady Officer of Pune Airport) धक्काबुक्की करणाऱ्या प्रवासी तरुणीला (Traveler Girl) अटक करण्यात आली. प्रवासी तरुणीने महिला अधिकाऱ्याच्या अंगठ्याचा चावा (Biting the thumb of a female officer) घेऊन शासकीय कामात अडथळा (Obstruction in Government Work) निर्माण केला.

गुंजन राजेशकुमार अग्रवाल (वय 24, रा. हावडा, पश्चिम बंगाल) (Gunjan Rajeshkumar Agrawal, West Bengal) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलातील निरीक्षक रुपाली ठोके (वय 39) (Rupali Thoke) यांनी विमानतळ पोलीस स्टेशन (Vimantal Police Station) मध्ये फिर्याद दिली आहे.

आरोपी गुंजन अगरवाल (Gunjan Agarwal) ही प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सीतून लोहगाव विमानतळावर उतरली. त्या वेळी तिने भाड्यावरुन टॅक्सी चालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. टॅक्सी चालकाने लोहगाव विमानतळ प्राधिकरणाकडे (Lohgaon Airport Authority) मदत मागितली. त्या वेळी विमानतळावरील व्यवस्थापक भक्ती लुल्ला (Bhakti Lulla) या विमानतळावरील प्रवेशद्वार क्रमांक 1 (Gate No.1 Pune Airport) परिसरात गेल्या.

गुंजन विमानतळाच्या आवारात टॅक्सी चालकाशी वाद घालून गोंधळ घालत होती. याचा विमानतळावरील प्रवेशद्वारात रांगेत थांबलेल्या प्रवाशांना त्रास झाल्याने भक्ती लुल्ला यांनी तिला शांतता राखण्याबाबत समजावून सांगितले. त्यावेळी गुंजन अग्रवाल हिने केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलातील निरीक्षक रुपाली ठोके आणि विमानतळ व्यवस्थापक भक्ती लुल्ला यांच्याशी वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुंजनला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक वाकडे (PSI Wakade) तपास करत आहेत.

हेही वाचा - आता पुणे विमानतळही बनणार सुविधांमध्ये हायटेक !

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                   

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                 

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                 

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                 

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes               

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes              

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.