Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 6, 2023
राजकारणामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे का?#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest
पुणे, दि. 9 एप्रिल 2023 (चेकमेट
टाईम्स): वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station)
हद्दीतील गणपती माथ्याजवळ (Ganapati Matha) असलेल्या एनडीए
मैदानातून (NDA Ground) एका सराईत गुन्हेगाराला बेकायदेशीरपणे
बाळगलेल्या पिस्तुलासह अटक करण्यात (Arrested with Illegally Possessed
Pistol) वारजे पोलिसांना यश आले आहे. तो काही गुन्ह्यामध्ये फरार
असलेला आरोपी असून, त्याच्यावर सिंहगड रोड (Sinhgad Road police Station) आणि वारजे पोलीस स्टेशन मध्ये 7 गुन्हे दाखल असल्याचे वारजे पोलीस
स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके (Senior PI Dagadu Hake) यांनी चेकमेट टाईम्सशी (Checkmate Times) बोलताना
सांगितले.
वारजे माळवाडी पोलीस
स्टेशन पुणे शहर कडील तपास पथकातील अंमलदार पोलीस नाईक अमोल राऊत यांना, सागर नावाचा
तरुण एनडीए मैदानावर असून, त्याचेकडे पिस्तुल असल्याची माहिती त्यांचे खबऱ्याकडून मिळाली.
यावरून वारजे पोलीस स्टेशनचे तपासपथकातील पोलीस उपनिरीक्षक (Officers of the Investigation Team) रामेश्वर पार्वे (PSI Rameshwar Parve), पोलीस नाईक अमोल राऊत (Amol Raut), पोलिस शिपाई विजय भुरुक (Vijay Bhuruk) यांनी सदर ठिकाणी
जावून खात्री केली असता, तेथे एक तरुण संशयितरित्या (Suspect) फिरताना दिसून आला.
यावेळी त्यास तपास
पथकाने चारही बाजूने घेराव करून, शिताफीने ताब्यात घेवुन, त्याची अंगझडती घेतली असता,
त्याचे कमरेला 35 हजार 100
रुपये किंमतीचे 1 देशी बनावटीचे पिस्तुल आणि त्यामध्ये 1 जिवंत काडतूस, असे विनापरवाना
(without license pistol and
cartridge) स्वतः जवळ बाळगलेले असताना मिळून आला. त्यास त्याचे नाव विचारता
त्याने सागर गणेश सुतार (वय 25 वर्षे, रा. देशमुखवाडी, शिवणे, पुणे, सध्या राहणार तळेगाव, ता. मावळ, जि. पुणे) (Sagar Ganesh Sutar) असे असल्याचे
सांगितले.
यावेळी पुणे
शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार
(CP Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त
संदिप कर्णीक (Joint
Commissioner of Police Sandeep Karnik), अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र
डहाळे (Upper
Commissioner of Police Western Regional Division Rajendra Dahale), पोलीस उपआयुक्त परिमंडळ 3 सुहेल शर्मा (Deputy Commissioner of Police Circle 3
Suhail Sharma), सहायक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग सुनिल पवार (Assistant Commissioner of Police Kothrud
Division Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
दगडू हाके (Senior PI
Dagdu Hake), गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे (Crime
PI Dattaram Bagwe) यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक रमेश बाबर
(API Ramesh Babar), पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस नाईक प्रदिप शेलार (Pradeep Shelar), अमोल राऊत, पोलीस शिपाई विजय भुरुक, बंटी मोरे (Bunty More), श्रीकांत भांगरे (Shrikant Bhangare), विक्रम खिलारी (Vikram Khilari), अजय कामठे (Ajay Kamathe) यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
त्याला वारजे
पोलीस स्टेशनला आणून, विश्वासात घेऊन, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, सदर आरोपी
हा सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील दाखल गुन्हयातील फरार आरोपी असून, त्याच्याविरुध्द
सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये 5 आणि वारजे पोलीस स्टेशन मध्ये 2 गुन्हे दाखल असून,
तो एक सराईत गुन्हेगार असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील
तपास पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे हे करत आहेत.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84