Type Here to Get Search Results !

BRT: आळंदी ते दिघी कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेला बीआरटी मार्ग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Alandi to Dighi BRT route not started - checkmate times

पुणे, दि. 20 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आळंदी ते दिघी बीआरटी मार्ग (Alandi to Dighi BRT route) तयार करण्यात आला आहे. परंतु, कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या बीआरटी मार्गांवर अद्याप एकही बस धावली नाही. बीआरटी मार्गाचे काम पूर्ण होऊन वर्ष होत आले, तरी हा मार्ग अद्याप उदघाट्नाच्या प्रतीक्षेत आहे. या मार्गाचे उद्घाटन कधी होणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

महापालिकेच्या हद्दीत येणार्‍या या पालखीमार्गाचे काम महापालिकेने चार टप्प्यात करीत रुंदीकरण केले आहे. साठ मीटरचा विस्तीर्ण रस्ता करून या मार्गावर पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, सेवारस्ता, बीआरटीएस मार्ग, वृक्षारोपण करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा व दुभाजकांमध्ये सोय करण्यात आली आहे.

त्यासोबतच नॉन बीआरटी बसच्या वाहतुकीसाठी हा मार्ग खुला करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याच्या मधोमध केलेला बीआरटीएस मार्गावर एकही बस अद्याप धावली नाही. प्रवाशांचा प्रवास गतिमान व्हावा, याकरिता पीएमपी प्रशासनाने महत्त्वाच्या मार्गावर बीआरटी सुरू केले आहे. मात्र, बीआरटीचा सुरू होण्याचा प्रवास मंद झाला आहे. मागील एक वर्षापासून बीआरटी सुरू झाली नाही. या मार्गाजवळील रस्त्यावरून दिवसभरात 144 बसच्या माध्यमातून 1600 फेर्‍या होतात. मात्र, हा मार्ग गेल्या वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

या मार्गाची लांबी 6 किमी असून चर्‍होली ते दिघीतील मॅगझीन चौक या 60 मीटर रुंदी असलेल्या मार्गावर एकूण 9 बसथांबे असणार आहेत. तर, दत्तनगरपासून (Dattanagar) जकात नाक्यापर्यंत (Jakat Naka) या मार्गाची रुंदी 30 मीटर झाली आहे. या रस्त्यावर 6 बसथांबे प्रस्तावित असून, तीन येण्याकरिता व तीन जाण्याकरिता असणार आहेत.

याबाबत भोसरीचे आगारप्रमुख विजयकुमार मेदगे (Vijayakumar Medge, head of Bhosari) म्हणाले कि,”दिघी-आळंदी बीआरटी मार्गावर बीआरटी बस चालवून चाचणी घेण्यात आली आहे. प्रशासनाकडून आदेश आल्यावर लवकरच उदघाट्न करण्यात येईल.”

प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर वर्षभरात बीआरटीएस मार्गावर बस धावण्याचे नियोजन केले होते. मात्र, नंतर उद्भवलेली कोरोनाची परिस्थिती यामुळे प्रशासनाने केलेले नियोजन फसले. आता कोरोनाची परिस्थिती निवळली असली तरी या मार्गावर बीआरटी बसची गरज भासणार आहे. बीआरटी प्रशासनाकडून याबाबत नियोजन सुरू असून, बस उपलब्ध झाल्यावर उद्घाटनाचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.