Type Here to Get Search Results !

Warje Malwadi: भर पावसात डांबरी रस्ता करण्याचे पालिकेचे प्रयोजन?; वाहून गेल्यास जबाबदार कोण?

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Asphalting of road in Warje Malwadi in rain - checkmate times

पुणे, दि. 21 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी मधील एका रस्त्याचे भर पावसात डांबरीकरण (Asphalting of road in Warje Malwadi in rain) करण्याचे प्रयोजन केले जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये दररोज सायंकाळी येणाऱ्या अवकाळी पावसाने हा रस्ता वाहून गेल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तर अवकाळी पाऊस मार्गस्थ होत नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम करू नये अशी मागणी ‘चेकमेट टाईम्स’च्या वाचकांनी केली आहे.

वारजे माळवाडी मधील आदित्य गार्डन सिटी (Aditya Garden City) येथील झेंडा चौक (Jhenda Chowk) ते ओव्हल नेस्ट सोसायटी (Oval Nest Society) दरम्यानचा 80 फुटी डीपी रोड गेल्या 15 दिवसांपासून मिलिंग करून ठेवला आहे. मात्र मिलिंग केल्यावर लगेचच रस्ता करायला न घेता, तो एवढे दिवस तसाच पडून ठेवला. तिथे कोणत्याही धोक्याचे सूचना देणारे, अथवा काम चालू असल्याबाबतचे फलक देखील लावण्याचे सौजन्य पुणे महानगरपालिका प्रशासन असेल की ठेकेदाराने दाखवले नाही. त्यामुळे दरम्यानच्या काळात या रस्त्यावर अनेक दुचाकी चालकांचे घसरून पडल्याने अपघात झाले.

पुणे महानगरपालिकेचे कोणतेही काम करत असताना कामाचे स्वरूप, काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे नाव, काम पूर्ण करण्याचा कालावधी आणि धोक्याचे सूचना देण्याचे फलक लावणे अनिवार्य असताना, पुणे महानगरपालिकेच्या मुन्नाभाई अभियंत्यांच्या कृपेने ठेकेदार मनमानी कारभार करताना दिसतात. मात्र आता तर कहरच झाला असून, या झेंडा चौक ते ओव्हाळ नेस्ट रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे प्रयोजन समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून दररोज सायंकाळी अवकाळी पाऊस पडतोय. काल गुरुवार दि. 20 एप्रिल 2023 दुपार नंतर तर गारांच्या वर्षावात मुसळधार पाऊस पडला. नेमके कालच या रस्त्यावरील डांबरीकरण सुरु करण्याचे प्रयोजन करण्यात आले होते. सुदैवाने पाऊस लवकर आला, अन्यथा डांबरीकरण करून झाल्यावर पाऊस आला असता तर, रस्ता नक्कीच वाहून गेला असता आणि ठेकेदार हात वर करून बिल घ्यायला मोकळा झाला असता.

हेही वाचा -

आताही तसेच काही नियोजन असून, निकृष्ठ दर्जाचा नियमबाह्य रस्ता करायचा आणि पावसाने वाहून गेल्याचे निमित्त करायचे असेच काही नियोजन चालू असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत. एकदा रस्ता वाहून गेला की, थर्ड पार्टी इन्स्पेक्शन, कोअर कटिंग, क्वालिटी चेक आणि असे अनेक सोपस्कार न करता बिलिंग करता येऊ शकते. मात्र यामुळे या भागातील नागरिकांना चांगल्या रस्त्यापासून वंचित राहण्याची वेळ आल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून, हे काम अवकाळी पाऊस मार्गस्थ होत नाही, तोपर्यंत पुढे ढकलण्याची गरज असल्याचे ‘चेकमेट टाईम्स’च्या वाचकांनी सांगितले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.