Type Here to Get Search Results !

Dogs Attack: खडकवासल्याच्या पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Deer attacked by loose dogs at khadakwasla - checkmate times

पुणे, दि. 21 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) पाणी पिताना अचानक पाच ते सहा मोकाट कुत्र्यांनी (Street Dogs attackd deer) एका हरणावर हल्ला चढवून जखमी केले. त्यावेळी स्थानिक युवकांनी प्रसंगावधान दाखवत कुत्र्यांच्या तावडीतून हरणाची सुटका केली. वन विभागाने रेस्क्यू पथकाच्या (Forest department rescue team) मदतीने हरणाला उपचारांसाठी दाखल केले.

ही घटना कुडजे (ता. हवेली) (Kudje) येथे मंगळवारी (दि. 18 एप्रिल 2023) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. हरणाचा आवाज ऐकून स्थानिक युवक संकेत सोनवणे, विठ्ठल उमाटे, परमेश्वर उमाटे, आर्यन अविनाश पायगुडे, विश्वतेज जगताप, विष्णू कोंडरवाड यांनी तीरावर धाव घेतली. त्यांनी कुत्र्यांवर दगडांचा मारा करीत हरणाची सुटका केली.

मान, पोट व पायांना कुत्र्यांनी जोरदार चावा घेतल्याने हरीण गंभीर जखमी झाले. पोलीस पाटील दत्ता पायगुडे यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर खडकवासला विभागाच्या वनरक्षक सुनीता कुचगावे, भूगाव येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. रेस्क्यू पथकाच्या नरेश चांडक (Naresh Chandak), सायली पिलाणे (Sayali Pilane), एजाज शेख (Aijaj Shaikh), तयाब सय्यद (Tayaba Sayyad) यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर हरणाला उपचारांसाठी भूगाव (Bhugaon) येथील केंद्रात दाखल केले.

हेही वाचा -

उन्हाळ्यात वणवे लागत असल्याने एनडीएच्या जंगलात तसेच खडकवासला धरण खोर्‍यात वन्यप्राण्यांना जंगलात चारा, पाणी मिळत नाही. त्यामुळे ससे, हरीण असे प्राणी खाद्य, पाण्यासाठी धरणावर येतात. या वेळी मोकाट कुत्री त्यांची शिकार करतात. हे प्रकार दरवर्षी घडतात. एनडीए प्रशासनाने सीमा भिंतीच्या आत वन्यप्राण्यांसाठी पाणवठे करावेत (Watersheds for wild animals) आणि वन विभागाने अधिवास क्षेत्रात नैसर्गिक पाणवठ्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.