कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 21, 2023
पृथ्वी दिन पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #EarthDay2023 #EarthDay
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 21 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही जारची मागणी वाढत आहे. जारमधून पाणी विक्री करणाऱ्यांना आता अन्न व औषध प्रशासनाची (Food and Drug Administration - FDA) परवानगी घ्यावी लागणार आहे. सुरक्षित पाण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले गेले आहे.
‘एफडीए‘ बाटलीबंद पाण्याची (Sealed Water) गुणवत्ता नियंत्रित करते. पण, जेव्हा पाण्याची नाणे टाकून विक्री होते किंवा ते ‘कुल जार’मधून मोहोरबंद न करता विक्रीसाठी ठेवले जाते, त्या वेळी ‘एफडीए’च्या नियंत्रण कक्षाच्या बाहेर जाते. अशा वेळी पिण्यासाठी सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी असते. त्यामुळे महापालिका किंवा संबंधित ग्रामपंचायत यांनी यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र या विक्री होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याची, तसेच त्याच्या नियंत्रणाची कोणतीही यंत्रणा नसल्याचे या दोन्ही संस्थांकडून स्पष्ट करण्यात आले.
पुण्यामध्ये विशेषतः उपनगरांमध्ये पाच रुपयांचे नाणे टाकून दहा लिटर पाणी मिळणाऱ्या केंद्रांमधून हे जार भरले जात होते. शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असल्याने पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या पोटात जाणारे पाणी किती सुरक्षित आहे, याची काळजी प्रत्येक बाटली विकत घेताना केली पाहिजे. बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखणे ही ‘एफडीए’ची जबाबदारी आहे. त्यासाठी पाण्याच्या उत्पादन कक्षाची स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याचा दर्जा याचा बारकाईने तपासला जातो. त्यात दोष आढळल्यास उत्पादन थांबविण्यापर्यंतचे आदेश देण्याची तरतूद कायद्यात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग मंत्री संजय राठोड (Food and Drug Administration Department Minister Sanjay Rathod) म्हणाले कि,”स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक जारमधून पाणी विकत घेतात. या पाण्याची शुद्धता, स्वच्छता आणि आरोग्य तपासण्यासाठी सध्या कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही. त्यामुळे या प्रकारच्या जारमधून पाणी विक्री करणाऱ्यांना यापुढे अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी अधिसूचनेचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.”
हेही वाचा -
नागरिकांनी ‘आयएसआय’ मार्क ('ISI' Mark) असलेल्या बंद बाटलीतील पाणी घ्यावे कारण हे पाणी प्रयोगशाळेतून तपासणी केलेले असते. प्रक्रिया केलेल्या पाण्यात जिवाणूंची वाढ होत नाही. तसेच याचे व्यवस्थित स्वच्छता असलेल्या ठिकाणी उत्पादन होते.
एका दिवशी दोन हजार लिटर किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन करणाऱ्या बाटलीबंद पाणी उत्पादक कंपनीला केंद्रीय परवाना आवश्यक असतो. त्यापेक्षा कमी उत्पादन क्षमतेच्या कंपनीला राज्य परवाना घेणे बंधनकारक असते. तसेच ‘बीआयएस’चा परवाना अत्यावश्यक ठरतो. दरवर्षी याचे नूतनीकरण करणे आवश्यक असते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84