खालील लिंक वर क्लिक करा
काय आहे चेकमेट ग्रुप?
— Checkmate Times (@checkmate_times) April 13, 2023
पुण्याच्या राजकीय घटना
पुण्याच्या गुन्हेगारी
पुण्याचे कार्यक्रम
पुण्याची वाहतुक
पुण्याचे पर्यावरण
आणि सर्व सदस्यांचे आवडते ‘चेकमेट क्विझ’
अशी महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आत्ताच चेकमेट ग्रुपचे सहभागी व्हाhttps://t.co/XwfVqKh133
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 14 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) सरावादरम्यान फायरिंग करताना 13 वर्षीय विद्यार्थ्यांच्या डोक्यास गोळी लागून त्याच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या प्रशिक्षकास न्यायालयाने 7 वर्ष सक्तमजुरी आणि पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव (Sessions Judge P. P. Jadhav) यांनी सदोष मनुष्यवधाबद्दल हा निकाल दिला. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील राजेश कावेडिया (Public Prosecutor Rajesh Kavedia) यांनी पाहिले.
आमोद अनिल घाणेकर (वय 27, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) (Amod Anil Ghanekar) या प्रशिक्षकास शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेत पराग देवेंद्र इंगळे (वय 13) (Parag Devendra Ingle) याचा मृत्यू झाला होता. सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) मुख्यालयात 1 फेब्रुवारी 2013 ला प्रकार घडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पराग हा पाषाण (Pashan) येथील लॉयला शाळेचा (Loyla School) विद्यार्थी होता. घटनेच्या दिवशी सरावादरम्यान घाणेकर हा मुलांना जमिनीवर झोपवून गोळीबार करण्याचे प्रशिक्षण देत होता. त्यावेळी पराग अचानक उठून उभा राहिला आणि त्याचवेळी घाणेकरच्या बंदुकीतील गोळी परागच्या डोक्याला लागली होती. गोळी लागल्यानंतर परागवर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. तो तीन वर्षे कोमात होता. मात्र सात जानेवारी 2016 रोजी त्याचा कमांड रुग्णालयात मृत्यू झाला होता. परागची आई तीन वर्ष रुग्णालयात मुलगा बरा होण्यासाठी प्रार्थना करीत होती.
याबाबत घाणेकर विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) सदोष मनुष्यवधाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून घाणेकर विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.
दरम्यान, या गुन्ह्यातून वगळण्यासाठी घाणेकरने अर्ज केला होता. तो न्यायालयाने सप्टेंबर 2014 मध्ये फेटाळून लावला होता. दंडाच्या रकमेतील तीन लाख रुपये परागच्या कुटुंबीयांना नुकसान भरपार्इ द्यावी. घाणेकरने दंड भरला नाही तर त्याला अतिरिक्त 1 वर्ष शिक्षा भोगावी लागेल, असे आदेशात नमूद आहे.
हेही वाचा -
आरोपीने केलेला गुन्हा आणि कृत्य गुंतागुंतीचे नव्हते. मात्र, सुरवातीलाच एनसीसीने योग्य पावले न उचलल्याने हे प्रकरण अधिक क्लिष्ट झाले. गुन्ह्यातील मुद्देमाल आणि शस्त्र वेळेत दिले नाही. तर आरोपीच्या हातून गोळीबार झाल्याचे कृत्य बचावपक्षाने गुंतागुंतीचे केले. त्यामुळे खटला लांबला, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.
कोणताही पालक मुलांना शाळेत पाठवतो तेव्हा त्यांना ताब्यात घेणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी असते की, विद्यार्थ्यांचे संरक्षण करावे. मात्र या गुन्ह्यात प्रशिक्षकाने हातात बंदूक घेतली. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद ॲड. कावेडिया यांनी केला होता.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84