Type Here to Get Search Results !

Terrorist Activities: पुण्यातील या अनधिकृत शाळेत दहशतवादी प्रशिक्षण केंद्र आढळले; एनआयए

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

NIA declared blue bells school unauthorised - checkmate times

पुणे, दि. 19 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): दहशतवादी कारवायाची योजना (Terrorist Activities) आखण्यासाठी वापर होत असल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency - NIA) पुण्यातील ब्ल्यू बेल्स शाळेचे (Blue Bells School) दोन मजले सोमवारी सील केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिक्षण विभाग (Education Department) खडबडून जागे झाले. शिक्षण विभागातर्फे या शाळेची चौकशी करण्यात आली, त्यात ही शाळा अनधिकृत (Unauthorised School) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

दरम्यान, शाळेविरूद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे (Audumbar Ukirde, Deputy Director of Education, Pune Division) यांनी दिली. राष्ट्रीय तपास यंत्रणेनेच्या कारवाईनंतर अखेर दुसऱ्या दिवशी शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांच्या गटाला शाळेच्या चौकशीसाठी पाठविले.

या चौकशीत शाळेकडे बोगस मान्यता प्रमाणपत्र (Bogus Accreditation Certificate) असल्याचे आढळून आले. तत्कालीन शिक्षण उपसंचालक यांच्या स्वाक्षरीचे पत्र शाळेकडे आहे. परंतु या पत्राचा आवक जावक क्रमांक शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध नाही. तसेच या शाळेकडे असणाऱ्या मान्यता पत्रावरही बनावट स्वाक्षरी (forged signature) असल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा -

याबाबत उकिरडे म्हणाले,”ब्ल्यू बेल्स ही स्वयं अर्थसहाय्यित शाळा असून 2019 मध्ये ही शाळा सुरू झाली आहे. या शाळेने इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग शाळेत आहेत. या शाळेकडे उपलब्ध असणारे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांचे मान्यता प्रमाणपत्र बोगस आहे. राज्य शासनाच्या मान्यतेचे प्रमाणपत्र खरे आहे की खोटे हे तपासण्यात येणार आहे. दरम्यान या शाळेच्या चौकशीचा अहवाल राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (State Education Commissioner Suraj Mandhre) यांना सादर केला आहे.”

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                               

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes               

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes               

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/         

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes         

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                      

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes    

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.