Type Here to Get Search Results !

Pune Elections: पुण्यातील तब्बल 20 वर्षांनंतर होणार्‍या या निवडणुकीसाठी 195 पैकी 138 उमेदवारांची माघार; 18 जागांसाठी 57 उमेदवार रिंगणात

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, VChekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Pune krushi utpanna bajar samiti election - checkmate times

पुणे, दि. 21 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत (Pune krushi utpanna bajar samiti election) 18 जागांसाठी 57 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. विकास सोसायटीच्या 11 आणि ग्रामपंचायतीच्या 4 मिळून 15 जागांसाठी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर (Annasaheb Magar) सहकार पॅनेल विरुद्ध सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीमध्ये (हवेली तालुका) थेट लढत होणार आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर हवेली तालुक्यात प्रचाराची रणधुमाळी पाहावयास मिळणार आहे.

तब्बल 20 वर्षांनंतर होणार्‍या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी साठी गुरुवारी (दि. 20 एप्रिल 2023) दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार वैध 195 उमेदवारी अर्जांमधील 138 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 18 जागांसाठी 57 उमेदवार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) प्रकाश जगताप (Election Returning Officer and District Deputy Registrar (Rural) Prakash Jagtap) यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची अंतिम मतदार यादी शुक्रवारी (दि. 21 एप्रिल 2023) सकाळी 11 वाजता प्रसिध्द केली जाणार असून, उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटपही केले जाणार आहे.

बाजार समितीवरील वर्चस्वासाठी विकास सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदारसंघ मिळून पक्षीय पातळीवर एकूण 18 पैकी 15 जागांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलकडून 15 उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत. निवडणुकीच्या प्रचारानिमित्त विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भूमिका आणि त्यांच्या होणार्‍या आगामी सभेकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

दुसर्‍या गटामध्ये सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीकडूनही (हवेली तालुका) या निवडणुकीत चांगली लढत अपेक्षित मानली जात आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तालुक्यातील उमेदवारांची एकीची मूठ बांधली आहे.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.