Type Here to Get Search Results !

PMC Pune: प्रशासकीय कामकाजात नाशिकचा पहिला नंबर; सांस्कृतिक मात्र पुणे तिसऱ्या क्रमांकावर

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Pune ranks third in administrative affairs - checkmate times

पुणे, दि. 22 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): 2022-23 या आर्थिक वर्षातील महसूल व्यवस्थापन (Revenue Management) आणि राज्य तसेच केंद्रशासनाच्या योजनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे महापालिकेस (Pune Municipal Corporation) गौरविण्यात आले आहे. पुणे महापालिका राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.

राज्यशासनाकडून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाचे मूल्यमापण करण्यासाठी ही स्पर्धा घेतली होती. त्यात, राज्यातील अ आणि ब वर्ग महापालिकांचा एकत्र गट करण्यात आला होता. या स्पर्धेसाठी केआरए निश्‍चित करण्यात आला होता. त्यात, मिळकतकराची वसूली, महसूली व जमा खर्च, अस्थापना खर्चाचे प्रमाण, वित्तीय व्यवस्थापन, भांडवली कामे याबाबत माहिती मागविण्यात आली होती. त्या आधारावर स्थानिक स्वराज्य संस्थाचे मुल्यमापन करून ही निवड करण्यात आली. याशिवाय, महापालिकेने केंद्रशासनाच्या स्वच्छ भारत मिशन, अमृत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना यासाठी केलेल्या कामांची दखल या मुल्यांकनात घेण्यात आली आहे.

नगरविकास दिनानिमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. राज्यात प्रशासकीय कामकाजात नाशिक महापालिकेस (Nashik Municipal Corporation) पहिला तर ठाणे महापालिकेस (Thane Municipal Corporation) दुसरा क्रमांक मिळाला आहे.

हेही वाचा -

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar), शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar), राज्याचे मुख्यसचिव मनुकुमार श्रीवास्तव (State Chief Secretary Manukumar Srivastava), अतिरिक्‍त मुख्य सचिव भूषण गगराणी (Additional Chief Secretary Bhushan Gagrani), प्रधान सचिव सोनिया सेठी (Principal Secretary Sonia Sethi) हे उपस्थित होते. तर, महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त आशा राऊत (Solid Waste Management Department Deputy Commissioner Asha Raut), महेश डोईफोडे (Mahesh Doifode) यावेळी उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.