Type Here to Get Search Results !

Pune Crime: कोथरूड मध्ये अल्पवयीन मुलींच्या गँगने एका मुलीला धुतले; दामिनी पथक मदतीला धावले

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Schoolgirls attacked a disabled girl in kothrud - checkmate times

पुणे, दि. 20 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): चित्रपटात शोभेल अशा पध्दतीने भर चौकात शाळकरी मुलींनी एका मुलीवर हल्ला चढवला. (Schoolgirls attacked a disabled girl) केसांना धरुन ओढत नेत मारहाण केल्याचा (Girls Fight) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भांडणात टारगेट झालेल्या मुलीचे कपडेही फाटले. हल्ला करणाऱ्या किशोरवयीन मुलींनी या घटनेचे चित्रिकरण करुन सोशल मिडियावर टाकले. त्याचे शिर्षक होते,’राडा....कंपनी...गँगस्टर.. विषय करायचा नाय लई.’ (Pune Crime news)

स्वतःला रावडी हीरो, गँगस्टरच्या रुपात पहावेसे वाटणे व त्याप्रमाणे वर्तन करण्याचा त्यांचा प्रयत्न या मुलींच्या पालकांना देखील माहिती नव्हता. सकाळी कामावर जायचे व रात्री घरी यायचे. यामध्ये मुलांशी संवादच हरवलेला. वाढीच्या वयात योग्य दिशा दर्शन न मिळाल्यामुळे नीरंकुश असलेली ही मुले भरकटण्याची शक्यताच जास्त. तसेच या मुलींबाबत घडले होते.

परिसरातील गुंडगीरी, डॅशिंगपणा, ऐय्याशीचे नकळत निर्माण झालेले आकर्षण, याला खतपाणी भेटले ते मोबाईलवरील मायाजालाचे. सोशल मिडिया व गेमच्या भावविश्वात अडकलेली मुले त्यातील पात्र स्वतःत पाहू लागली. त्यांची भाषा व वर्तनातील बदल समजायला पालकांनी कुटूंबासाठी वेळतर द्यायला हवा ना. त्याचाच हा परिणाम असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

कोथरुड पोलीस मधील दामिनी पथकाच्या रुपाली घावटे (Rupali Ghawte of Damini Squad in Kothrud Police) म्हणाल्या की,”या अल्पवयीन मुली गँग बनवणे, वाईट प्रवृत्ती, दादागीरी अशा गोष्टींना बळी पडत चालल्या होत्या. या मुलींना चौकीत बोलावून गुन्ह्याचे परिणाम समजावून सांगितले. तसेच भविष्याच्या दृष्टीने त्यांनी अशा गोष्टी पुन्हा करु नयेत म्हणून समज दिली व त्यांच्याकडून तसे लिहून घेतले.” (Pune Crime news)

जीला दोन वेळा मारहाण करण्यात आली ती मुलगी दिव्यांग होती. मारहाणीत आपल्या श्रवणयंत्राला हानी पोहचेल म्हणून ती यंत्र घरीच ठेवत होती. भेदरलेल्या अवस्थेत घरी आलेल्या मुलीला पाहून आईचेही मन गलबलले. वडीलांनी इन्स्टावर आपल्या मुलीला मारहाण होत असल्याचा व्हीडीओ पाहिल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी शाळेत भेट घेवून मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

मारहाण करणा-या मुलींशी चर्चा केली असता समजले की, या मुलींनी आपली टोळी बनवली होती. एकत्रितपणे विविध ठिकाणांना भेटी देणे, वाढदिवस साजरे करणे, रील्स बनवणे, सोशल मिडिया फॉलोअर्स वाढवणे यात त्या व्यस्त होत्या. गैरसमजुतीतून या दिव्यांग मुलीला मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. इन्स्टावर व्हीडीओ टाकण्यामागे आपली इमेज बनवणे हा त्यांच्या मनातील सुप्त हेतू उघड झाला.

भारती विद्यापीठ कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या जाधव (Vidya Jadhav, principal of Kanya Shala) यांनी यामध्ये पुढाकार घेत शिक्षण मंडळाच्या विशेष साधन व्यक्ती पदावर असलेल्या स्मीता सुर्यवंशी (Smita Suryavanshi) व विशेष शिक्षिका राधा बिरादार (Radha Biradar) यांच्या सहकार्यातून या दिव्यांग मुलीशी संवाद साधला. शाळेत जायचेच नाही असे तीने ठरवल्यामुळे तीच्या मनातील भिती दूर करणे महत्वाचे होते. ज्या मुलींनी तीला मारहाण केली त्यांना मार्गावर आणणेही तितकेच महत्वाचे होते. सर्व मुलींशी, पालकांशी स्वतंत्रपणे चर्चा करत या विषयावर सविस्तर माहिती घेण्यात आली. पोलिसांच्या सहकार्याने मुलींचे समुपदेशन करत त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करुन देण्यात आली. (Pune Crime news)

मुख्याध्यापिका विद्या जाधव म्हणाल्या की,”किशोरवयामध्ये मुले स्वतःचे व्यक्तीमत्व घडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या सभोवताली जे चालले असते त्यातील आवडत्या व्यक्तीमत्वांची निवड करतात. समाजमाध्यमातील आभासी व्यक्तीमत्वे, सेलिब्रेटी यांचे त्यांच्या मनात आकर्षण निर्माण होते. यातून ते आपला मार्ग निवडतात. पालक, शिक्षक, समाज प्रतिनिधीत्व करणारे यांनी नव्या पिढीच्या वाटचाली बाबत जागृत असणे आवश्यक आहे.”

स्मीता सुर्यंवंशी म्हणाल्या की,“या दिव्यांग मुलीच्या मनातील भिती घालवण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. मारहाणीत सहभागी मुलींना आपल्या चुकीची जाणीव करुन दिली आहे. गँगस्टर नव्हे तर समाज पुढे नेणारे नेतृत्व बना, अभ्यास करुन स्वतःची प्रगती करत सकारात्मक व्यक्तीमत्व घडवा असे त्यांच्या मनावर बिंबवले आहे. आता या मुलींच्या प्रगतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.” (Pune Crime news)

समाजातील असे प्रकार थांबवण्यासाठी काही बदल कौटुंबिक पातळीवर होऊ शकतात जसे कि, कुटूंबातील सर्व सदस्यांनी टीव्ही बंद करुन रात्रीचे जेवण गप्पागोष्टी करत एकत्र करणे, जेव्हा शक्य असेल तेव्हा दिवसातून काही वेळ आपल्या मुलांसाठी देणे, पालकांनी नियमित शिक्षकांशी संपर्क ठेवून पाल्याच्या प्रगतीचा आढावा घेणे, मुलांची दफ्तरे, वह्यावरील नोंदी, मोबाईलवरील क्रीया (अँक्टीव्हीटी) यांचे अवलोकन करणे, गरज पडल्यास शिक्षक, समुपदेशकाची मदत घेणे.

हेही वाचा - 111111111111111111111111111111111

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.