Type Here to Get Search Results !

PMC Transfer: पुणे महानगरपालिकेत बदल्यांचे सत्र सुरूच; या विभागांमध्ये झाले फेरबदल

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 19 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): महापालिकेच्या (PMC) विविध विभागांमधील दोन व तीन संवर्गातील सुमारे साडे सातशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्थापत्या, यांत्रिकी, विद्युत, शिक्षण अशा विविध विभागांमध्ये बदल्या (Transfer) मंगळवारी (दि. 18 एप्रिल 2023) करण्यात आल्या आहेत.

महापालिकेमध्ये एकाच खात्यात तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी पुर्ण केलेल्या 2 व 3 संवर्गातील प्रशासन अधिकारी, उपअधिक्षक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता या पदांवरील सेवकांची बदली महापालिकेच्या मंजुर (PMC Transfer) धोरणानुसार खात्याच्या एकूण मंजुर पदांच्या 20 टक्के मर्यादेत करण्यात आल्या. याबरोबरच लेखन संवर्गातील उपअधिक्षक, वरिष्ठ लिपीक, अभियांत्रिकी वर्गातील शाखा अभियंता या पदांच्या पदस्थापना करण्यात आली.

महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 12 एप्रिल 2023 रोजी अभियंता संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) आणि सोमवारी (दि. 17 एप्रिल 2023) अभियांत्रिकी संवर्गातील शाखा अभियंता, प्रशासकीय संवर्गातील उपअधिक्षक, कनिष्ठ लिपीक, वरिष्ठ लिपीक यांची बदली व पदस्थापना करण्यात आली.

हेही वाचा -

सुमारे 785 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुढीलप्रमाणे बदल्या करण्यात आल्या.

1.  स्थापत्य 109, विद्युत 17, यांत्रिकी 6 असे एकूण 122 जण,

2.  प्रशासन संवर्गातील अधिकारी 4, उपअधिक्षक 43, लिपीक 112, टंकलेखक 274 असे एकूण 433 जण,

3.  शाखा अभियंता (स्थापत्य) 18, उपअधिक्षक 56, वरिष्ठ लिपीक 139 असे एकूण 213 जण,

4.  शिक्षण विभागातील उपअधिक्षक 1, वरिष्ठ लिपीक पदस्थापना 6, लिपीक टंकलेखक 8 असे एकूण 17 जण

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                               

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes               

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes               

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/         

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes         

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                      

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes    

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.