Type Here to Get Search Results !

Aamba Mahotsav: पुण्यातील या मार्केट मध्ये भरणार आंबा महोत्सव; पहा खरेदीचा महत्वपूर्ण व्हीडीओ

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

aamba mahotsav at market yard from today - checkmate times

पुणे, दि. 1 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत (Maharashtra State Board of Agriculture Marketing) दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेंतर्गत आंबा महोत्सवाचे (Aamba Mahotsav) आयोजन केले जाते. यावर्षीही गुलटेकडी (Gultekdi), मार्केट यार्ड (Market Yard) मधील पीएमटी बस डेपो (PMT Bus Depot) शेजारील जिल्हा परिषदेच्या (Zillha Parishad) मोकळ्या जागेत सुरू करण्यात येणार आहे.

हा महोत्सव शनिवारपासून (दि. 1 एप्रिल 2023) सुरू होऊन साधारणतः 31 मे पर्यंत सुरू राहणार आहे. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा आंबा (Quality Mangoes) मिळावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.

यंदा महोत्सवात 70 स्टॉल उत्पादकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्राहकांना हापूस (Hapus), केशर (Keshar), पायरी आंबा (Payari Amba) तसेच बचत गटांची विविध प्रक्रियायुक्त उत्पादने खरेदीची संधी लाभणार आहे. कोकणातील उच्च प्रतीच्या हापूस आंब्याचा लाभ ग्राहकांनी घेण्याचे आवाहन कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दीपक शिंदे (Executive Director of Agriculture Marketing Board Deepak Shinde) यांनी केले आहे.

या महोत्सवाबाबत दीपक शिंदे म्हणाले कि,“चालू वर्षी ‘आंबा महोत्सव 2023’ चे आयोजन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे आणि पुणे जिल्हा परिषद, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील तसेच राज्यातील केशर आंबा उत्पादकांबरोबरच जिल्हा परिषदेकडील ग्रामिण विकास यंत्रणा विभागाकडील काही महिला बचत गटांचाही सामावेश असणार आहे.”

हेही वाचा - पुण्यात फळांचा राजा आंब्याची पहिली पेटी दाखल; मानाच्या पेटीची किंमत ४१ हजार रुपये

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes               

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes               

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/          

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                     

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes          

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n          

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.