Type Here to Get Search Results !

विमानांना या दिवसातील कापसासारख्या ढगांचा धोका; मृगजळात फसल्यास होऊ शकते हे नुकसान

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 26 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): सध्या पडत असलेले कडक ऊन आणि सतत पडणारा पाऊस, यामुळे उंच आकाशात क्युम्युनोलिंबस ढगांची (जास्त बाष्प असणारे ढग) (Cumunolimbus clouds) निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, त्याचा आकाशातून जाणार्‍या विमानांना धोका आहे, असे अलर्ट सतत हवामान विभाग विमानतळ यंत्रणेला देत आहे.

ढगांची निर्मिती पावसाळ्यात वेगाने होते. कारण, कडक ऊन आणि आर्द्रता या दोघांच्या संगमातून क्युम्युनोलिंबस ढगांची निर्मिती होते. मात्र, यंदा प्रथमच मार्च, एप्रिलमध्ये या ढगांची निर्मिती अतिशय वेगाने होते आहे. त्यामुळे आकाशातून प्रवास करताना हे भले मोठे ढग विमानांना मोठा धोका पोहचवू शकतात.

उंच आकाशात कापसासारखे पांढरे शुभ्र ढग दिसतात. त्यांची लांबी आणि उंची खूप मोठी असते. क्रिकेटच्या मैदानाएवढे विस्तीर्ण तसेच 12 ते 15 किलोमीटर उंची असते. बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे व अरबी समुद्राकडून येणार्‍या दमट वार्‍यांची टक्कर झाली की ही दोन्ही वारे उंचावर जातात व खूप मोठ्या प्रमाणावर बाष्प असणार्‍या ढगांची निर्मिती होते. आकाराने फुलकोबीसारखेच दिसणारे हे ढग चमकणारे व गर्जना असात, त्यांना क्युम्युनोलिंबस हे हवामानाच्या भाषेत म्हणतात. हा लॅटीन शब्द आहे.

या ढगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बाष्प तर असतेच; शिवाय विद्युतभारही असतो. धन व ऋण हे दोन्हीही भार त्यात असल्याने विमान त्यातून अथवा जवळून गेले तरी सर्व यंत्रणा बंद पडू शकते. याबाबत पायलटना या ढगांच्या जवळूनसुध्दा विमाने नेऊ नका. अशा प्रकारच्या सूचना व सतत अलर्ट दिले जात आहे.

“जे काळेभोर ढग दिसतात ते साधे असतात. त्यामुळे फक्त पाऊस पडतो. मात्र, क्युम्युनोलिंबस ढग हे पांढरे शुभ— चमकणारे असतात. यात इलेक्ट्रो मॅग्नेटिक लहरी असल्याने त्यातून विजांचा कडकडाट निर्माण होतो. त्यामुळे या ढगांचा विमानांना धोका असतो. त्यामुळे हे अलर्ट विमानांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. सध्या या ढगांचे प्रमाण वाढल्याने हे अलर्ट दिले जात आहेत.” असे पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के. एस. होसाळीकर (Pune Meteorological Department Additional Director General Dr. K. S. Hosalikar) म्हणाले.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.