या महत्वाच्या प्रश्नावर आपले मत मांडल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद
पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे का? आणि कशी?
तुम्ही तुमचे मत मांडले नसेल तर अजूनही वेळ
गेलेली नाही. त्वरित लिंक वर क्लिक करून आपले मत द्या
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 26, 2023
पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे का? आणि कशी?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #pune #traffic
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 28 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नामकरण राजगड तालुका असं करावं, त्यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांनी केली आहे. त्याबाबतचे पत्र पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांना पाठविले आहे. (Ajit Pawar demand to change name to velhe to rajgad)
सरकारला लिहिलेल्या पत्रात अजित पवार यांनी म्हटले आहे की,”स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे राज्य कारभार चालवला आहे. त्यामुळे या किल्ल्याशी राज्यातील जनतेच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणूनच वेल्हे तालुक्याचं नामकरण हे राजगड असे करण्यात यावं, अशी जनतेची तीव्र इच्छा आहे."
पुढे ते म्हणाले,“याबाबत तालुक्यातील 70 ग्रामपंचायतींपैकी 58 ग्रामपंचायतींनी नामकरणासाठी सकारात्मक ठराव दिला आहे. पुणे जिल्हा परिषदेनेही तसा ठराव केलेला आहे. वेल्हे तालुका हा शिवकालीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला तसेच स्वराज्यात महत्वाचे ठरलेले राजगड आणि तोरणा हे दोन किल्ले असलेला तालुका आहे. या तालुक्याचे जुने दस्तऐवज पाहता किल्ले तोरणाचे नाव प्रचंडगड या नावाने तालुक्याची ओळख होती.”
“तथापि या तालुक्याचे मुख्य ठिकाण हे वेल्हे बुद्रूक, घेरा येथे असून तालुक्याचे नाव वेल्हे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. वेल्हे तालुक्यातील जनतेच्या भावना ह्या राजगड किल्ल्याशी जोडलेल्या आहेत. स्वराज्याची पहिली राजधानी वेल्हे तालुक्यात असून किल्ले राजगडावरून या तालुक्याचे नामकरण हे राजगड करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात यावे.” अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84